सध्या बाजारात ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

देशातील सर्वच लहान मोठ्या व्यवसाय दाराकडे QR  कोड पेमेंट ऑप्शन उपलब्ध आहे.

त्यासोबतच काही ठिकाणी ऑनलाइन मोबाईलवर किंवा कोड किंवा पेमेंट लिंक पाठवून पेमेंट घेतले जात आहे.

जर तुम्ही सुद्धा यूपीआय वापरकर्ते असताल, तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत

सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगार फिशिंग मेल पाठवून, ग्राहकांचे पैसे लुबाडत आहेत.

फिशिंग लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व डेटा सायबर गुन्हेगाराकडे जातो, ज्यामुळे तो तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो.

बऱ्याच ठिकाणी अनोळखी QR कोड स्कॅन केल्यानंतर बँक खाते रिकामी झाल्याची पाहायला मिळतात.

यापासून वाचण्यासाठी अनोळखी QR कोड स्कॅन करणे टाळा, त्यासोबतच नको त्या लिंक वर क्लिक करू नका.

ग्राहकांना याबाबत बँकेकडून वारंवार सूचना दिल्या जातात मात्र ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात.

जर तुमच्या सोबत असे काही घडले तर Cyber Crime Portal वर तक्रार नोंदवू शकता.