लक्झरी कारचा विचार केला तर Rolls Royce कंपनीचे नाव आघाडीला येते.
Rolls Royce ने Rolls Royce Specter भारतात लाँच केली आहे ज्यामध्ये शानदार फीचर्स आणि डिझाईन आहेत.
Rolls Royce Specter ही लक्झरी EV कार आहे.
या Rolls Royce Specter इलेक्ट्रिक कारची किंमत 7 कोटी रुपयांहून अधिक आहे.
यामध्ये 120kWh चा मोठा बॅटरी पॅक दिसतो, ही सिंगल चार्ज मध्ये 530 किमी पर्यंतची रेंज देते.
ही कार 195kW फास्ट चार्जरने चार्ज केल्यास, बॅटरी फक्त 35 मिनिटांत 10 ते 80% पर्यंत चार्ज होते.
या कारची बॅटरी 50kW DC चार्जरने चार्ज केल्यास, 10 ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 95 मिनिटे लागतात.
रोल्स रॉयसच्या इतर लक्झरी कार्सप्रमाणेच या कारची रचनाही अतिशय आकर्षक आणि आलिशान आहे.
या कारमध्ये, तुम्हाला रोल्स-रॉइसच्या क्लासिक डिझाइनसह आधुनिक डिझाइनचा चांगला स्पर्श पाहायला मिळेल.