अहमदाबाद मधील कंपनी Svitch ने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक बाइक CSR 762 लाँच केली आहे.

या बाईकची खास गोष्ट म्हणजे यात हेल्मेट ठेवण्यासाठी 40 लिटरची जागा आहे.

यामध्ये 3kW मिड-ड्राइव्ह PMS DC इलेक्ट्रिक मोटर प्रदान केली आहे जी 3.6kWh ट्विन लिथियम-आयन बॅटरीसह कार्य करते.

एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर या बाईकची बॅटरी 190 किलोमीटर (IDC) पर्यंत चालू शकते

या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे. या बाइकमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टमची गरज नाही कारण ही ई-बाईक थंड राहते

बाईकमध्ये ग्राहकांसाठी 6 राइडिंग मोड देण्यात आले आहेत, याशिवाय यात मोबाइल चार्जर, मोबाइल होल्डर, iOS आणि Android स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते

कंपनीने या इलेक्ट्रिक बाइकची किंमत 1,89,999 रुपये ठेवण्यात आली आहे