टाटा मोटर्सने आपल्या चौथ्या इलेक्ट्रिक कारचे लॉन्चिंग केले आहे, Tata Punch EV चे बुकिंग भारतात सुरु झाले आहे.

ही देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही असून ग्राहक फक्त 21,000 रुपयांच्या टोकनमध्ये कार बुक करू शकतात

नवीन Punch EV अनेक विशेष आणि नवीन फीचर्स सह सुसज्ज आहे, त्याची डिलिव्हरी लवकरच सुरू होऊ शकते

नवीन Punch EV प्रगत कनेक्टेड टेक इंटेलिजेंट इलेक्ट्रिक वाहनावर आधारित आहे, यामध्ये तुम्हाला चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

यात एलईडी हेडलॅम्प, मल्टी मोड रेजेन, ईएसपी आणि स्मार्ट डिजिटल डीआरएल आहेत. नवीन SUV ला हवेशीर फ्रंट सीट्स, 6 एअरबॅग, एअर प्युरिफायर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, 360 डिग्री कॅमेरा, ऑटो होल्ड आणि सनरूफसह EPB आहे.

याशिवाय यात 17.78 सेमी हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, ही कार R16 डायमंड कट अलॉय व्हीलसह येते.

Punch EV दोन बॅटरी पॅक ऑप्शन सह येईल. ही पहिली कार आहे जी इलेक्ट्रिक फर्स्ट आर्किटेक्चरवर आधारित आहे.

एका चार्जवर ही कार 300km ते 600km ची रेंज देण्यास सक्षम असेल.

कंपनीने किंमतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही, नवीन पंच EV ची किंमत 9 लाख ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे.