आजकालच्या डिजिटल जीवनामध्ये मोबाईलचा वापर, अनियमित जीवनशैली यामुळे डोळ्याची दृष्टी कमी होते.

यामुळेच डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्याच्या बाजूला सूज येणे तसेच जवळच्या आणि दूरच्या वस्तू पाहताना त्रास होणे अशा समस्या उद्भवतात.

आज आपण डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी काही महत्वपूर्ण घरगुती उपाय पाहणार आहोत.

दररोज आवळ्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते, आवळ्यामध्ये असणारे विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट डोळ्यासाठी फायदेशीर असतात.

नियमित आवळ्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढविण्यास मदत होते.

बदामामध्ये असणारे विटामिन ए डोळ्याची दृष्टी वाढविण्यास फायदेशीर ठरतात

दररोज भिजवलेले बदाम आणि बदामाचे दूध पिल्याने दृष्टी सुधारते.

डोळ्यांमध्ये होणाऱ्या जळजळीसाठी गुलाबजलाचा वापर केल्याने आराम मिळतो.

त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून, त्याला गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यानंतर डोळे निरोगी राहतात.

चप्पल न घालता दररोज हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते.