उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली!पाहूया काय आहे बाजारभाव.

वाढत्या ऊष्णतेमुळे फळांच्या रसांसोबत लिंबूपाणी लिंबूशरबत याची मागणी वाढली आहे.

बाजारात ३महिन्यांपूर्वी १५०ते २५०रुपय शेकडा मिळणारा लिंबू आज घाऊक बाजारात ४५० ते ६५० रुपय शेकडा दराने विकला जात आहे. घाऊक बाजारात लिंबाचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील एका लिंबासाठी ६ रुपय मोजावे लागत असून,२० रुपयांत ४ लिंबू दिले जात आहेत.

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला बाजारात अंधरप्रदेश,नगरमधून मोठ्या प्रमाणात लिंबू येत आहेत.नेहमी लिंबाच्या ८ते१० गाडयांची आवक घाऊक भाजीपाला बाजारात नेहमी होते.

परंतु, आता या ठिकाणावरून येणाऱ्या लिंबाच्या गाड्याची संख्या कमी होत आहे.सध्या ५te६ गाड्या बाजारात येत आहेत.त्यामुळे मागणी पूर्ण करता येत नाही,अशी परिस्थिती आहे.मे महिना संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात असणार आहे.