सध्या तुरीला मिळत आहे ११ हजार रुपय प्रतिक्विंटलच्या पुढे दर! येणाऱ्या कालावधीत काय राहील मार्केट भाव?

तूर मार्केट भाव: शेतमालाच्या बाजारपेटीतील भावाच्या दृष्टीकोनातून पहिले तर जवळपास सर्व पिकांचे दर यावर्षी घसरलेल्या स्तिथीत आहेत. शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले सोयाबीन आणि कापसाने सुद्धा शेतकऱ्यांची बाजारभावाच्या बाबतीत निराशाच आहे.

तसेच कांद्याच्या बाबतीत पण म्हणता येईल.महाराष्ट्रीतील बऱ्याच भागामध्ये कांदा लागवड केली जाते व कांद्यावर निर्यातबंदी लागल्यामुळे प्रचंड प्रमाणात दर घसरले आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकरण्यांना बसला. परंतु या उलट मात्र तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा यावर्षी दिलासा मिळताना दिसून येत आहे.

सध्या तुरीच्या भावात चांगली तेजी दिसून येत आहे.बऱ्याच  सरासरी दर हे 11 हजाराच्या पुढे आहेत. म्हणजेच सरासरी दर पातळी पाहिली तर दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे व कमाल दर हा 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आहे.

 यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे तुरीचा पुरवठा कमी होत आहे व त्यामुळे बाजाराला चांगला आधार मिळत आहे. परंतु पुढच्या दीड ते दोन महिन्यात तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

२०२४ मध्ये कशी राहील बाजारभावाची स्थिती? तुरीच्या स्टॉच्या च्या अनुषंगाने अनुषंगाने तर बरेच शेतकरी शेतकरी जूनमध्ये तुरीची विक्री करण्याची शक्यता आहे.आणि आता तुरीची आयात पण सुरु आहे.तसेच बाजाराच्या दृष्टीकोनातून बघितले तर तुरीच्या कमी अधिक प्रमाणात सरकारच्या सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे.

तसेच प्रक्रिया प्लांटची देखील खरेदी सुरू आहे. परंतु ती देखील गरजेप्रमाणेच आहे. तुरीच्या डाळीलाही मागणी आहे. परंतु उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. याच गोष्टीमुळे तुर बाजाराला चांगला आधार मिळत आहे.

शेतकऱ्यांची तूर थांबावी का विकावी?काय म्हणतात बाजार अभ्यासूक?

सध्या तुरीला दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे व जास्तीत जास्त भाव 12 हजाराच्या आसपास आहे. सध्या जो काही तुरीला दर मिळत आहे त्यामध्ये पाचशे रुपयेपर्यंत चढ उतार राहू शकते असा देखील एक अंदाज आहे.

त्यामुळे जे शेतकरी या कालावधीमध्ये तूर विकण्याचे नियोजन करण्याचा विचार करत आहात त्यांनी बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करू शकतात असे देखील या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले. तसेच यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे व असे झाले तर तुरीची लागवड देखील वाढेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अजून महिन्यामध्ये जर चांगला पाऊसाला सुरुवात झाली व लागवड खरच वाढली तर याचा काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो व यामुळे बाजारातील सुधारणा काही कालावधीकरिता थांबू शकते असे देखील तुर बाजारातील तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

तुरीची आयात देखील आहे महाग.

तुरीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तूर आयात केली जात आहे.परुंतु आयात केलेली तूर भाव देखील जास्त असल्याने ती तूर सुद्धा महाग मिळत आहे.आयात तुरीचा सरासरी दर ९०००रुपय ते १००००रुपय इतका आहे.

त्यामुळे पुढील हंगामातील तूर जोपर्यंत येत माही तोपर्यंत तुरीचे भाव तेजीतच राहतील असा एक अंदाज अभ्यासुकणी व्यक्त केला आहे.असे भाव सणासुदीच्या काळामध्ये आणखी वाढू शकतात.दरात काही चड -उतार देखील दिसतील असा अंदाज अभयस्कांनी दर्शवला आहे.