हलक्या जमिनीत बागायत करायची इच्छा तर करा सीताफळ लागवड!या दोन जाती देतील भरगोस उत्पन्न आणि मिळवाल लाखो रुपये!

मोठ्या प्रमाणात शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करून विविध फळबाग आणि भाजीपाला पिकांची लागवड करून चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवत आहेत.पारंपरिक शेती आणि पिके पद्धती आता काळाच्या ओघात मागे पडली.त्यातल्या त्यात मागच्या काही वर्षात अनेक तरुण शेताकडे वळले असून असे तरुण आता विविध प्रकारच्या फळांच्या लागवडीला प्राधान्य देताना दिसून येत आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, पेरू, अलीकडच्या काही कालावधीत ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी व इतर फळबागांची लागवड वाढली आहे. परंतु यामध्ये सिताफळाची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरते. कारण सिताफळ लागवड तुम्ही हलक्या जमिनीत देखील करू शकतात व सिताफळाला कोरडवाहू पिक म्हणून ओळखले जाते.

तसेच महाराष्ट्रातील हवामान या फळ पिकासाठी खूप फायद्याचे आहे. तुम्हाला देखील कमीत कमी खर्चात फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही सीताफळाची लागवड करू शकतात व याकरिता सीताफळाच्या दोन जाती खूप महत्त्वपूर्ण ठरतील. या जाती सीताफळाचे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असे उत्पादन देतात.

या आहेत सीताफळाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या जाती:

1- बाळानगर सीताफळाची बाळानगर जात खूप फायदेशीर असून ती महाराष्ट्रामध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला नवीन सिताफळ लागवड करायची असेल तर तुम्ही बाळानगर या सीताफळाच्या व्हरायटीची लागवड करू शकतात.या सिताफळाच्या व्हरायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते व गर जास्त असतो व गरामध्ये साखरेचे प्रमाण साधारण असते व टिकाऊपणा जास्त असतो.

बाळानगर या सिताफळाच्या जातीमध्ये गराचे प्रमाण जास्त असल्यामुळे सिताफळ प्रक्रिया उद्योगांमध्ये याला मागणी चांगली असते व त्यामुळे सीताफळाच्या इतर व्हरायटीपेक्षा या व्हरायटीच्या फळाला बाजार भाव देखील चांगला मिळतो. या व्हरायटीच्या एका सिताफळाचे सरासरी वजन 360 ग्राम इतके असते व त्यामध्ये सरासरी 40 बिया असतात.

2- अर्का सहन या व्हरायटीच्या  सीताफळामध्ये गोडवा जास्त असतो व गुणवत्तेच्या बाबतीत देखील ते इतर  वरायटी पेक्षा सरस आहे. विशेष म्हणजे अर्का सहन जातीच्या एका सीताफळाचे वजन एक किलोपर्यंत देखील भरू शकते. यामध्ये साखरेचे प्रमाण 22 टक्क्यांपेक्षा जास्त असून बिया खूप कमी असतात.

म्हणजेच एकूण फळाचे जे काही वजन आहे त्यापैकी दहा टक्के बिया असतात व या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे  या जातीच्या परागीकरणास हाताने परागीकरण करावी लागते व यामुळे फळांची योग्य वाढ होते व चांगले उत्पादन मिळते.

अशाप्रकारे हाताने परागीकरण केल्यामुळे अर्का सहन जातीच्या सीताफळाला खूप चांगला बाजारभाव देखील मिळतो. या जातीच्या सीताफळापासून आठ वर्षात 40 ते 45 किलो उत्पादन एक झाड देते व एकरी दहा टन इतके उत्पादन मिळते.