जगातील सर्वात महागडा आंबा आपणास माहित आहे का? या पाहूया.
expensive mango: भारतामध्ये अनेक हंगामनिहाय फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये प्रामुख्याने पहिले तर उन्हाळयाच्या दृष्टीकोनातून आंबा आणि कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतात आणि महाराष्ट्रात घेतले जाते .
उन्हाळ्याच्या कालावधीत तर बऱ्याच घरांमध्ये आमरसाच्या बेत आखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत आंब्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये या कालावधीत विविध प्रजातीचे आंबे दाखल होतात.
आंब्याच्या विविध प्रजातींमध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागात पिकणाऱ्या हापूस आंब्याला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठी मागणी आहे. साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये डझन इतक्या किमतीने हापूस आंबा विकला जातो.
तसेच भारतामध्ये हापूस आंबा व्यतिरिक्त दशेरी तसेच लंगडा, केशर सारख्या इतर आंब्याच्या प्रजाती देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. भारत हा आंब्याचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून देखील जगाच्या पाठीवर ओळखला जातो.
परंतु जगाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारताच्या हापूस आंबा व्यतिरिक्त जगामध्ये सर्वात महागडा आंबा असून त्याची किंमत लाखात आहे. याच आंब्याची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण या लेखात बघणार आहोत.
हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा:
आपण जर जगातील सर्वात महागडा आंबा पाहिला तर त्याचे उत्पादन भारतात नव्हे तर जपान ला आहे.जपानमध्ये तयार होणाऱ्या या आंब्याचे नाव मियाझकी आंबा असावं असून त्याचा रंग जांभळा असतो.
हा आंबा जपान येथील मियाझकी शहरामध्ये उत्पादित केला जातो त्यामुळे याला मियाझकी असे नाव पडले आहे. या फळाचे उत्पादन आता इतर देश हि घेत आहेत, जशे कि थायलंड फिलिपाइन्स बांगलादेश व भारत .
मियाजकि आंब्याची प्रतिकिलो किंमत आणि वैशिष्ट्ये:
मियाझकी हा आंबा प्रामुख्याने उष्ण आणि सूर्यकिरण असणाऱ्या अनुकूल वातावरणात लागवड केला जातो.उत्पादित होणाऱ्या आंब्याचे वजन सरासरी ३०० ग्राम पर्यंत असते.या आंब्याला जपान मध्ये तैया-नो-टोमॅगो नावाने देखील ओळखतात.
आंबा पिकतो तेव्हा प्रामुख्याने जांभळा आणि लाल असतो. खायला अतिशय स्वादिस्ट आनि गोड असतो तसेच रसाळ देखील भरपूर प्रमाणामध्ये असतो.या आंब्याच्या किमती बद्धल बोलायचे झाले तर जागतिक बाजारभावामध्ये मिंयाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपय प्रति किलो असून जे शेतकरी या आंब्याची लागवड करतात त्यांना त्याच्या सुरक्षेतसाठी उपाययोजना करावे लागतात.
लाखात किंमत असल्यामुळे साधारण माणसाला हा आंबा विकत घेणे परवडत नाही.परुंतु काही नादिक आणि श्रीमंत लोक या आंब्याची खरेदी करतात.हा आंबा बाजारात विकला जात नाही तर त्याचा लिलाव केला जातो.भारतामध्ये सिलिगुडी आणि रायपूर या ठिकाणी आंबा महोत्सव पार पडला त्यामध्ये त्यामध्ये मिंयाझाकी हा आंबा प्रदर्सनासाठी ठेवण्यात आला होता.