PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज बॅलन्स तपासा,जमा होणार PM kisan चा हप्ता.

PM Kisan | विदर्भासह मराठवाडा आणि इतर भागात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तिथे ते देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील.

नवी दिल्ली | 28 February 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीने पुन्हा फटका दिला. गारपीटीने हातातोंडाशी आलेले पीक गेले. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना आज पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम आहे. याठिकाणी ते कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा होणार आहे. आज तुमच्या बँक खात्याचे बॅलन्स नक्की तापासा.

पीएम किसानचा 16 वा हप्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता आज 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल

आतापर्यंत खात्यात 2.8 लाख कोटी

मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.

पैसा आला की नाही खात्यात?

१)सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल https://pmkisan.gov.inवर जा.

२)या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.

३)या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.

४)आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

५)त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.

६)ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

योजनेसाठी असा करा अर्ज

 • pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
 • ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
 • ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
 • तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
 • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
 • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
 • ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
 • नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
 • आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
 • शेतीसंबंधीची माहिती जमा करा
 • सेव्ह बटणावर क्लिक करा
 • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल

असे करा ekyc

 • ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
 • बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
 • फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.