तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या ग्लोबल इन्वेस्टर मीट मध्ये देशातील बरेच उद्योगपती हजेरी लावत आहेत, जिथे सर्व उद्योगपती आपापले विचार  स्पष्ट करीत आहेत.

याच इव्हेंटमध्ये महिंद्रा ऑटोमोबाईल कंपनीची मालक आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी व्यक्त केल्या.

या इव्हेंट मध्ये आनंद महिंद्रा यांना त्यांच्या  आवडत्या कारबाबत विचारल्यानंतर त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली. 

ते म्हणाले की " मी एकदा नाशिकमध्ये स्कार्पिओ च्या टेस्ट ड्राईव्ह इव्हेंट साठी निघालो होतो, त्यावेळेस मी बोलेरो घेऊन निघालो होतो, तेव्हा माझे ड्रायव्हर स्कार्पिओ चालवत होता"

पुढे ते म्हणाले " जेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला विचारले, कशी आहे कार.. तेव्हा तो म्हणाला कार चांगली आहे परंतु बोलेरो चा मुकाबला नाही."

यानंतर ते हसत म्हणाले 'बोलेरो' अशी कार आहे जिला मी आज पण चालवतो.

Mahindra Bolero ही अशी कार आहे जी कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार पैकी एक आहे, जिचा परफॉर्मन्स ही खूप तगडा आहे.