नजर हटेचना,मारुतीने केला धमाका,स्टायलिश स्विफ्ट बाजारात.

मारुती सुझुकी स्विफ्ट अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय बाजारात उपलब्ध.

मारूती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट 2024:

चौथ्या generation ची मारुती सुझुकी स्विफ्ट अखेर भारतात दाखल झाली.car खरेदीचा विचार करत असाल तर केवळ 11 हजारात कार बुक करू शकता.या कारमध्ये एकूण 5 varient आहेत.LXI,VXI,VXI(O),ZXI,ZXI(+)अशी हि कार खेरदी करता येते.

जुन्या SWIFT पेक्ष्या मोठा बदल:

नव्या मारुती स्विफ्टमधे जुन्या स्विफ्ट पेक्ष्या बरेच बदल करण्यात आले आहेत.तिचा आकार वाढवण्यात आला आहे.नवीन कारची लांबी 3860MM, रुंदी 1695mm आहे.जुन्या गाडी पेक्ष्या हि लांबीत 15mm,रुंदीत 40mm आणि उचीत 30MM जास्त आहे.दोन्ही कार चा व्हीलबेस जवळपास सारखाच आहे.हि कार 9 रंगात उपलब्ध आहे.

MARUTI SUZUKI SWIFT 2024 FEATURES:

या कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटिरिअर थीम देण्यात आली आहे. यामध्ये 40 हून अधिक कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये 9 इंचाचा स्मार्ट प्रो प्लस इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये वायरलेस चार्जिंग, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, वाईड एंगल रिअर व्ह्यू कॅमेरा, रिअर एसी वेंट, 16-इंचाची ड्युअल टोन अलॉय व्हील्स,डिजिटल AC पॅनल, टाईप-A आणि टाईप्स-C USB चार्जिंग पोर्ट्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED टेललॅम्प्स आणि LED फॉग लॅम्प सारखी फीचर्सची रेलचेल आहे.

Maruti Suzuki Swift 2024 चे इंजिन

नवीन मारुती स्विफ्टमध्ये सर्वात महत्वाचा बदल इंजिनमध्ये झाला आहे. यामध्ये नवीन 1.2 लिटर, 3-सिलेंडर, जेड-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82PS पॉवर आणि 112Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिनला माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आहे. त्यामुळे कारला जास्त मायलेज आणि शक्ती मिळते. नवीन स्विफ्टला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन्ही गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. मारुती सुझुकीच्या दाव्यानुसार, जुन्या Swift च्या तुलनेत नवीन स्विफ्टचे मॅन्युअल मॉडल 10 टक्के तर ऑटोमॅटिक मॉडल 15 टक्के जास्त मायलेज देते. कंपनी लवकरच नवीन स्विफ्टचे CNG मॉडल पण घेऊन येणार आहे.

नवीन मारुती स्विफ्टची किंमत किती

नवीन मारुती स्विफ्टची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरु होते. या मॉडलचे टॉप व्हेरिएंटची किंमत 9.65 लाख रुपयांच्या घरात आहे. या सर्व किंमती एक्स-शोरुमच्या हिशोबाने आहेत. जुन्या स्विफ्टची किंमत 6.24 लाख रुपयांपासून सुरु होत होती. भारतीय बाजारात या नव्या कोऱ्या स्विफ्टचा सामना Hyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago सोबत होईल.

नवीकोरी मारुती सुझुकी स्विफ्टचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता या कारने बाजारात येताच धमाका केला आहे. नवीन स्विफ्टचे डिझाईन, फीचर्स आणि इंजिनमधील बदल ग्राहकांना वेगळा ड्रायव्हिंग फील देईल. ही कार अधिक स्टायलिश झाली आहे. कारच्या मायलेजमध्ये पण सुधारणा झाली आहे. ZXi+ हे या कारचे टॉप मॉडेल आहे.

नवीन स्विफ्टमध्ये अनेक नवीन फीचर्स

सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशनच्या मारुती सुझुकी स्विफ्टच्या एक्सटिरियर आणि इंटिरियरमध्ये काही खास असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात एलईडी लाइटिंग सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, EBD आणि ब्रेक असिस्टसह सुसज्ज ABS आहे. हिल होल्ड कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटर आणि इतर अनेक स्टँडर्ड आणि सुरक्षा वैशिष्ट्ये पाहिली जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी स्विफ्टची लांबी सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.