POCO या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक से बढकर एक स्मार्टफोन लॉन्च करून भारतीय बाजारपेठेचे लक्ष स्वतःकडे ओढवून घेतले आहे. या स्मार्टफोन कंपनीने मागील काही काळात नवीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले, तसेच ही स्मार्टफोन कंपनी खूप तगड्या फीचर्स सह अजून एक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म -X वरून एक बातमी समोर आली आहे की POCO ही स्मार्टफोन कंपनी POCO X5 Pro 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे.
या प्लॅटफॉर्मवरून अजून एक माहिती अशी लिक झाली आहे की हा स्मार्टफोन वेगवेगळ्या स्टोरेज वेरे सोबत बाजारपेठेत उतरणार आहे, या स्मार्टफोनची किंमत देखील समोर आली आहे. प्लॅटफॉर्मवरून माहिती मिळाल्याप्रमाणे हा स्मार्टफोन आपल्याला पुढील वर्षातील 6 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळेल.चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
POCO X5 Pro 5G फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन अतिशय पावरफुल आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस चिंचोल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो.
Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778 प्रोसेसर पहायला मिळेल. या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बोलायचं झाले तर या शानदार स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज पाहायला मिळेल, तसेच हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज येण्याची शक्यता आहे.
हा स्मार्टफोन आपल्याला Horizon Blue, Astral Black, Yellow या तीन रंगांमध्ये पहायला मिळू शकतो.
हे पण वाचा – 2023 मधील हे ‘5’ प्रीमियम स्मार्टफोन एकदा पहाच, iphone ला देत आहेत टक्कर
POCO X5 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी साठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सेटअप देण्यात आला आहे, जो की 18 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ आणि 2 मेगापिक्सल एवढा आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफी करताना अतिशय उच्च दर्जाचा परफॉर्मन्स मिळू शकतो. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर यामध्ये 5000mAH ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग साठी 67W चा व्हाट्स चार्जेस देण्यात आला आहे.
POCO X5 Pro 5G किंमत
या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म -X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 17,999 एवढी असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून अद्याप कुठल्याही प्रकारची किमती विषयीची माहिती देण्यात आलेली नाही.
Realme 11 Pro Plus या स्मार्टफोनची 200M कॅमेरा क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित