2023 मधील हे ‘5’ प्रीमियम स्मार्टफोन एकदा पहाच, iphone ला देत आहेत टक्कर

iphone competitor

iphone या कंपनीचे स्मार्टफोन खूपच महागडे असतात, हे स्मार्टफोन समाजामध्ये स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरली जातात. हे स्मार्टफोन अतिशय मॉडर्न फीचर्स आणि हाय क्वालिटी इक्विपमेंट सोबत तयार केलेली असतात. त्यासोबतच या स्मार्टफोनच्या किमती सुद्धा अतिशय जास्त असतात, परंतु बाजारातील इतर स्मार्टफोन कंपन्या सुद्धा त्यांची प्रीमियम स्मार्टफोन बाजारात घेऊन येत असतात.

आज आपण हेच पाहणार आहोत आयफोन व्यतिरिक्त इतर ब्रँडचे प्रीमियम स्मार्टफोन, त्यांची फीचर्स आणि किमती याबद्दल माहिती.

Xiaomi 13 Pro

Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन 2023 वर्षातील कंपनीचा सर्वाधिक शक्तिशाली स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चीपसेट वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट सपोर्ट सह येतो. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 50 MP+ 50 MP+ 50MP असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, त्यासोबतच सेल्फी साठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनला पावर देण्यासाठी 4850 एमएच बॅटरी दिली गेली आहे.

Google Pixel 8 Pro

हा स्मार्टफोन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google चा उत्पादन आहे. हा स्मार्टफोन मागील बऱ्याच काळापासून बाजारामध्ये उपलब्ध आहे. परंतु काही काळापासून या स्मार्टफोन च्या विक्रीमध्ये कपात झाली आहे. यंदाच्या वर्षी कंपनीने त्यांचा Google Pixel 8 Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन गुगल च्या Tensor G3 चीप सेट द्वारे सज्ज आहे.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले 120 हर्ट्स रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP+ 48MP+ 48MP असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी यामध्ये 5050Mah बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra 5G

Samsung Galaxy S23 हा स्मार्टफोन कंपनीच्या सिरीज मधील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला जातो, हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येतो.

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 200MP + 12MP + 10MP + 10MP क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यामध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध करून दिला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे.

vivo X90 Pro

vivo ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी स्मार्टफोन वेगवेगळ्या फीचर्स सह स्मार्टफोन प्रेमींसाठी लॉन्च करते. या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत vivo X90 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 9200 हा चीपसेट दिला होता.

या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रमानी 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.73 इंचाचा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा ट्रिपल सेंसर कॅमेरा दिला गेला होता. डिवाइस ला पावर देण्यासाठी 4870mAH बॅटरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा – Oppo Reno 10 Pro 5G या स्मार्टफोन ने उडवून टाकला धुरळा, स्पेसिफिकेशन पाहून आश्चर्यचकित व्हाल

OnePlus 11

OnePlus या स्मार्टफोन कंपनीचा भारतीय बाजारपेठेत फारच दबदबा आहे. OnePlus 11 5G फ्लॅगशिप सेगमेंट मधील हा स्मार्टफोन कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन पैकी एक आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे, हा डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट आणि 1440 x 3216 पिक्सेल रिझोल्युशन येतो.

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 48 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल असा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची जलद चार्जिंग बॅटरी देण्यात आली आहे.

POCO X5 Pro 5G फीचर्स झाले लिक, कॅमेरा क्वालिटी पाहून व्हाल दंग