iphone 14 खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू, 36 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

iphone 14
iphone 14 खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू, 36 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

भारतीय बाजारपेठेत iphone कंपनीच्या स्मार्टफोनची खूपच क्रेझ वाढली आहे. स्मार्टफोन प्रेमी या कंपनीच्या नवीन स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक स्मार्टफोन युजरला असे वाटते की आपण सुद्धा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजेच आयफोन घेऊन फिरावे.iphone कंपनीच्या स्मार्टफोनच्या किमती पाहून सर्वसामान्य माणसाच्या तो बजेट बाहेर असतो, परंतु या स्मार्टफोन कंपनीच्या iphone 14 वर आत्तापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. म्हणजेच ज्यांचे बजेट 25-30 हजार रुपये असू शकेल अशा स्मार्टफोन प्रेमींना देखील iphone 14 खरेदी करता येईल.

स्मार्टफोन युजरचे मन आकर्षित करण्यासाठी या स्मार्टफोन कंपनीने वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 2023 मधील सर्वात जास्त विक्री झालेला स्मार्टफोन असल्याचे सिद्ध झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिस्काउंट बद्दल माहिती.

iphone 14 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.1 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 1200 nits ब्राईटनेस आणि 1170 x 2532 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो.iOS 16 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Hexa-core प्रोसेसर सह Apple A15 Bionic हा चिप्स दिला गेला आहे ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 128GB 6GB RAM, 256GB 6GB RAM, 512GB 6GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरियंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये Ceramic Shield glass दिला गेला आहे.

iphone 14 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 12 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी देखील 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. अशा दमदार कॅमेरा सेटअप मुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप चा विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइसला पावर देण्यासाठी 3279mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या तीस मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Realme 12 Pro plus हा स्मार्टफोन धडकन भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी आणि फीचर्स अतिशय दमदार

iphone 14 किंमत

ह्या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 79,900 रुपये एवढी होती. iphone 15 सिरीज लॉन्च झाल्यानंतर 10,000 रुपयांनी iphone 14 ची किंमत कमी करण्यात आली. ई-कॉमर्स ॲमेझॉन वर हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर मध्ये घेत असाल तर 22,500 रुपयापर्यंत सूट मिळत आहे. Amazon वर हा स्मार्टफोन फक्त 36,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

तर फ्लिपकार्ट वर सर्व ऑफर्स आणि सवलतीसह हा स्मार्टफोन फक्त 38,199 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन आपल्याला Midnight, Purple, Starlight, Blue, Red, Yellow या कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो.

Samsung Galaxy A55 हा स्मार्टफोन होतोय लॉन्च, प्रोसेसर पाहून युजर झाले आश्चर्यचकित