Redmi Note 13 सिरीज बाजारपेठेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बऱ्याच जणांना या सिरीजच्या लॉन्चिंग ची आतुरता लागली आहे. परंतु आता Redmi Note 13 सिरीजची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 4 जानेवारीला त्यांची ही सिरीज दाखल करणार आहे. यासाठी आवश्यक सर्व ते तयारी पूर्ण केले गेले आहेत. या सिरीजमध्ये कंपनीचे तीन मॉडेल असणार आहेत, ज्यामध्ये Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G हे स्मार्टफोन उपलब्ध असतील. चला तर मग पाहूया या स्मार्टफोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
Contents
Redmi Note 13 5G फीचर्स
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला आहे, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9200+ चीप सेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 108MP + 8MP + 2MP असा कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यामध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये 5000mAh बॅटरी मिळते, जी 33W फास्ट चार्जिंग फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi Note 13 Pro 5G
Redmi Note 13 Pro 5G या फोन मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेंसर दिले आहे. त्यासोबतच 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. या डिवाइस ला पावर देण्यासाठी 5100 mah बॅटरी 67W टर्बो फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.
Redmi Note 13 Pro+ 5G फीचर्स
कंपनीने Redmi Note 13 Pro Plus या स्मार्टफोनमध्ये Gorilla Glass Victus प्रोटेक्शन सह 1.5K कर्व AMOLED डिस्प्ले जाहीर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra chipset चिपसेट मिळणार असल्याची कंपनी कडून पुष्टी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 120W वायर्ड हायपरचार्ज कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल, ज्याचा दावा आहे की फोन 19 मिनिटांत शून्य ते 100 टक्के चार्ज होईल.
येथून करा खरेदी
जर तुम्हाला सुद्धा Redmi Note 13 सिरीज मधील स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. हा स्मार्टफोनच्या मायक्रो साईट्स दोन्ही ई-कॉमर्स वेबसाईटवर पाहायला मिळतात. हे स्मार्टफोन 4 जानेवारीला भारतामधील लॉन्च होणार आहेत, तेव्हा तुम्ही हे स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Redmi Note 13 Series किंमत
Redmi ची ही नवीन सिरीज नवीन वर्षामध्ये भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे, मिळालेल्या लिक्स नुसार भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत 15,000 ते 30,000 रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते. याबाबत मात्र कंपनीकडून कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाहीत, तरी लॉन्चिंग नंतर यांच्या खऱ्या किमती आपल्यासमोर येतील.
Royal Enfield Shotgun 650 Launch Date : जानेवारीमध्ये धडकणार ही 650 सीसी इंजिन असणारी जबरदस्त बाईक