Samsung Galaxy A55 हा स्मार्टफोन होतोय लॉन्च, प्रोसेसर पाहून युजर झाले आश्चर्यचकित

Samsung Galaxy A55

भारतीय बाजारपेठेत Samsung या स्मार्टफोन कंपनीने बहुतांश स्मार्टफोन युजर्स मनावर राज्य केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy S24 ही सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही सिरीज भारतीय बाजारपेठेमध्ये 17 जानेवारी रोजी प्रस्थापित होईल अशी माहिती दिली गेली आहे. लागलीच ही स्मार्टफोन कंपनी Samsung Galaxy A55 या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग वर काम करत आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला दमदार कॅमेरा क्वालिटी, खतरनाक असे फीचर्स आणि तगडा असा प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.

जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A55 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2340 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa Core प्रोसेसर सह Samsung Exynos 1480 हा चिपसेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपण 1TB पर्यंत मेमरी कार्ड टाकू शकतो.

हे पण वाचा – iphone 14 खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू, 36 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

Samsung Galaxy A55 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटीचा विचार केला गेला तर या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिल्या जाऊ शकतो, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी कॅमेरा सेटअप मध्ये 50 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल असा सेटअप दिला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप चा विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy A55 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये अंदाजे किंमत 39,990 रुपये ठेवली जाऊ शकते. या स्मार्टफोनच्या किमती विषयी कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Bajaj Platina CNG : बाजारामध्ये येत आहे देशातील पहिली CNG बाईक