Bajaj Platina CNG : बाजारामध्ये येत आहे देशातील पहिली CNG बाईक

Bajaj Platina CNG
Bajaj Platina CNG : बाजारामध्ये येत आहे देशातील पहिली CNG बाईक

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मुळे सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांचे वाहने इलेक्ट्रिकल आणि सीएनजी स्वरूपामध्ये लॉन्च केली आहेत. परंतु दुचाकी वाहनधारकांना मात्र पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सुटका मिळत नव्हती, त्यामध्ये बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर केली. परंतु आता बाजारामध्ये बरेच काळ गाजवणारी Bajaj Platina बाईक CNG व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जात आहे, यासाठी पर्यायी इंधन म्हणून CNG बाईकची चर्चा होत आहे. लवकरच बाजारामध्ये CNG आणि LPG गॅसवर चालणारे वाहने आपल्याला पाहायला मिळतील. कंपन्यांचा हा शोध इथे थांबणार नसून त्यापुढेही कंपन्या इतर इंधन पर्याय आहे शोधत आहेत.

बजाज ऑटो इंडस्ट्रीज संचालक राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाइकमधील सुरक्षा, रेंज, चार्जिंग आणि बॅटरी लाइफ याबाबत उत्पादकांना कोणतीही चिंता नाही. सीएनजी बाईक आल्यामुळे इंधनावरील खर्च 50% पर्यंत कमी होऊ शकतो. जर बजाजने ही योजना लागू केली तर संपूर्ण सीएनजी मोटरसायकल बनवणारी ती भारतातील पहिली कंपनी असेल. चला तर मग जाणून घेऊया बजाजच्या या CNG बाईक विषयी अधिक माहिती.

कधी येणार Bajaj Platina CNG

देशातील नावाजलेली कंपनी Bajaj ने वाढत्या इंधन खर्चावर पर्यायासाठी पुढाकार दाखविला आहे, यासाठीदेशातील अनेक कंपन्या नवीन प्रयोग करीत आहेत. ऑटोकारच्या एका रिपोर्टनुसार Bajaj देशातील पहिली CNG बायको करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्याला लवकरच Bajaj Platina CNG रस्त्यावर पाहायला मिळेल. सध्या कंपनीतर्फे या बाईकवर प्रयोग सुरू आहेत, कंपनीने या बाईकचे कोड नेम E101 असे दिले आहे. या बाईक वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ही अंतिम टप्प्यांमध्ये आहे, जर कंपनीला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आल्या तर येत्या सहा महिन्यांमध्ये ही बाईक आपल्याला पाहायला मिळेल.

वर्षाला 2 लाख CNG बाईक उत्पादन होणार

मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी येत्या काळामध्ये वर्षाला 2 लाख वाईक उत्पादन करू शकते. यासोबतच कंपनी LPG आणि इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या बाईच्या निर्मितीमध्येही प्रयोग करत आहे. यामुळे येत्या काळामध्ये चार चाकी वाहनांसारखे दुचाकी मध्येही वेगवेगळे इंधन पर्याय पाहायला मिळतील. यामुळेच जगभरातील कंपन्या इको फ्रेंडली मोबिलिटी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे आपल्याला लवकरच पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने कमी पाहायला मिळतील.

हे पण वाचा – Samsung Galaxy A55 हा स्मार्टफोन होतोय लॉन्च, प्रोसेसर पाहून युजर झाले आश्चर्यचकित

नवीन Pulsar लॉन्च होणार

बजाज ने त्यांच्या CNG प्रकल्पासोबतच नवीन पल्सर ची ही घोषणा केली आहे, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच त्यांच्या 250cc सेगमेंट मधील बाईकचे उत्पादन वाढ होणार आहे. त्यासोबतच Platina CNG ही बाईक लॉन्च केल्यानंतर इतरही बाईक CNG स्वरूपामध्ये लॉन्च करण्याचा विचार सुरू आहे .

सरकारने 2016 मध्ये सीएनजी पायलट प्रोजेक्ट सुरू केला

2016 मध्ये सरकारने CNG वर दुचाकी चालवण्यासाठी नवी दिल्लीत पायलट कार्यक्रम सुरू केला. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत, काही खाद्यपदार्थ वितरण सेवांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हा मॉडेल्सचा वापर करण्यात आला.

Samsung Galaxy चा सुरू आहे सेल, स्मार्टफोन मिळत आहेत खूपच कमी किमतीत