YAMAHA FZ-X Sport : ही पावरफुल बाईक 10 सेकंदात गाठते 120Km/H स्पीड

YAMAHA FZ-X
YAMAHA FZ-X Sport : ही पावरफुल बाईक 10 सेकंदात गाठते 120Km/H स्पीड

मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या स्पोर्ट बाईक लॉन्च करीत असतात, परंतु त्यापैकी अशा काही बाईक असतात ज्यांना खरेदी करण्यासाठी प्रत्येक जण विचार करीत असतो. त्यामध्येच आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका बाईक बद्दल माहिती घेऊन आलो आहोत ज्या बाईकचे नाव आहे Yamaha FZ-X.

कंपनीने आता याच बाईक बद्दल मोठी घोषणा केली आहे, इंडिया यामाहा मोटर ने त्यांच्या मोटरसायकल लाईन मध्ये मोठे बदल आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने FZ सिरीजच्या बाईक मध्ये कलर ऑप्शन ग्राफिक्स आणि इतर चेंजेस करून लॉन्च केले आहेत.

FZ सिरीज मधील बाईक लॉन्चिंग पासून देशभरात लोकप्रिय आहेत, कंपनीकडून याबाबत घोषणा केली आहे की यामध्ये कलर ऑप्शन, कॉस्मेटिक चेंजेस आणि ग्राफिक्स यामध्ये बदल केले जातील ज्यामुळे या बाईकच्या विक्रीला चालना मिळेल. चला तर मग जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

FZ-X नवीन अपडेट 

FZ-X ही बाईक बाजारामध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे परंतु कंपनी आता या बाईक मध्ये घेऊन आली आहे. कंपनीने यामध्ये आता नवीन कलर ऑप्शन दिले आहेत ज्यामध्ये मॅट टायटन, डार्क मेटॅलिक, मॅट कॉपर आणि क्रोम कलर उपलब्ध आहेत. त्यासोबतच तुम्ही त्यांच्या जुन्या कलर ऑप्शन मध्ये ही बाईक खरेदी करू शकता. यात एलईडी डीआरएलसह गोलाकार हेडलाइट्स आहेत. ही मोटरसायकल 17 इंची अलॉय व्हीलसह येते.

FZ-X इंजिन 

या मोटरसायकलमध्ये 149 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 12.32hp पॉवर आणि 13.3Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

FZ-X डिझाईन 

FZ-X ही रेट्रो स्टाईल बाइक आहे. नवीन फीचर्स म्हणून त्यात गोल्डन व्हील्स, डीआरएलसह क्रोम एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर आणि ट्रॅक्शन कंट्रोल समाविष्ट करण्यात आले आहेत. 

FZ-X फीचर्स 

FZ-X फीचर्स लिस्टमध्ये सर्व LED लाइट्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह LCD स्क्रीन, USB सॉकेट, ट्रॅक्शन कंट्रोल आणि साइड स्टँड सेन्सरची सुविधा आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर देखील आहे. ही बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. 

याशिवाय Y-Connect ॲप कंपनीच्या यामाहा FZ-X Deluxe बाइकसोबत उपलब्ध असेल. या ॲपद्वारे दुचाकी आणि मोबाइल एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीनवर फोन नोटिफिकेशन्स दिसू शकतात. 

या ॲपद्वारे कॉल अलर्ट, एसएमएस, ई-मेल,ॲप कनेक्टिव्हिटी स्टेटस आणि फोन बॅटरी लेव्हल स्टेटस समाविष्ट केले आहेत. बाईकच्यानोटिफिकेशन फोनवर पाहता येतात. यात फुल युजेस ट्रॅकर, पार्किंग लोकेशन नोटिफिकेशन, रेव्हस डॅशबोर्ड आणि रँकिंग अशा सुविधा मिळतात.

Splendor Plus EMI : फक्त 20,000 हजारांमध्ये ही बाईक घरी घेऊन जा

सस्पेन्शन आणि ब्रेक 

यात 41mm टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सात-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक युनिट देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी यात 282mm फ्रंट आणि 220mm रियर डिस्क देण्यात आली आहे. 

FZ X किंमत

Yamaha FZ X यावेळी ची किंमत मॅट कॉपर आणि मॅट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये अंदाजे 137087 रुपये इतकी ठेवली आहे तर त्याच्या FZ X डार्क मॅट ब्लू 137089 रुपये इतके आहेत.

Realme Note 50 हा स्मार्टफोन धडकणार भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून पडतात युजर्स प्रेमात