Realme Note 50 हा स्मार्टफोन धडकणार भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून पडतात युजर्स प्रेमात

Realme Note 50
Realme Note 50 हा स्मार्टफोन धडकणार भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून पडतात युजर्स प्रेमात

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकीच एक Realme ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारात उच्चांकावर आहे. या स्मार्टफोन कंपनीचे संस्थापक आणि CEO स्कायली यांनी काही दिवसापूर्वी नोट 50 सिरीजची घोषणा केली होती. या सिरीज मध्ये पहिला स्मार्टफोन Realme Note 50 या महिन्यातील पुढील आठवड्यात 24 जानेवारी रोजी इंटरनॅशनल लेव्हलवर लॉन्च केला जाईल. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत.

ज्यामध्ये फोनचा दमदार लूक आणि डिझाईन चा खुलासा करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस iphone सारखा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. परंतु, अद्याप या स्मार्टफोनचा फ्रंट पॅनल समोर आलेला नाही. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Realme Note 50 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर. या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 560 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम आणि MediaTek Dimensity 7050 या प्रोसेसर सह येतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

YAMAHA FZ-X Sport : ही पावरफुल बाईक 10 सेकंदात गाठते 120Km/H स्पीड

Realme Note 50 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा आणि बॅटरी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.

Realme Note 50 किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 16,890 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोन च्या किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखाद्या नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

New Hero Passion : या बाईक समोर फिक्या पडतील सर्वच बाईक, यामध्ये आहेत ऍडव्हान्स फीचर्स