New Hero Passion : या बाईक समोर फिक्या पडतील सर्वच बाईक, यामध्ये आहेत ऍडव्हान्स फीचर्स

New Hero Passion
New Hero Passion : या बाईक समोर फिक्या पडतील सर्वच बाईक, यामध्ये आहेत ऍडव्हान्स फीचर्स

केवळ भारतामध्येच नाही तर सगळ्यात प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी म्हणून Hero Motorcorp कडे पाहिले जाते. हिरो वारंवार त्यांच्या नवनवीन टेक्नॉलॉजी सोबत बाईक लॉन्च करत असते, त्यासोबतच त्यांची सर्वात जास्त विक्री होणारी बाई हिरो स्प्लेंडर ही तर आजवर सुद्धा विक्रीच्या बाबतीत सर्व बाईक ना मागे टाकते.

Hero ने त्यांची प्रसिद्ध बाइक Passion नवीन लुक मध्ये बाजारामध्ये उतरवणार आहे, बोलले जात आहे की ही बाईक अतिशय आकर्षक आणि किलर लुक सोबत येणार आहे. कंपनीकडून सध्या विकला जाणारा पॅशन प्रो चा मॉडेल बंद करण्यात येऊन नवीन व्हेरियंट बाजारामध्ये येणार आहे.

याबाबत कंपनीकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती जाहीर केली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट नुसार ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. चला तर मग जाणून घेऊया आगामी काळात येणाऱ्या Hero Passion या बाईक विषयी अधिक माहिती.

New Hero Passion फीचर्स 

नव्याने लॉन्च होणाऱ्या Hero Passion या बाईकमध्ये तुम्हाला 124 cc एअर कुल्ड इंडियन मिळेल, हे इंजन अतिशय पावरफुल आणि मजबूत बनवले जाईल. या नवीन बाईक मध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक ऑप्शन दिले जातील त्यासोबत इलेक्ट्रिक स्टार्टर ऑप्शन सुद्धा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नवीन बाईक मध्ये कीक स्टार्ट चा ऑप्शन वगळला जाऊ शकतो. त्यामुळे हिरोची ही पहिली बाईक असणार आहे  ज्यामध्ये कीक स्टार्ट ऑप्शन नसणार आहे.

काही रिपोर्टनुसार ह्या बाईकचे मायलेज वाढलेले पाहायला मिळणार आहे, अपडेट नंतर ही बाई 50 ते 60 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देणे सक्षम होईल. त्यासोबत शहरी भागामध्ये फिरताना 45 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज मिळू शकते.

या बाईकच्या फीचर्स लिस्ट मध्ये ऍडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामध्ये Splendor (Hero Splendor XTec), ग्लॅमर (Hero Glamour Xtec) या बाईक मध्ये दिल्याप्रमाणेच फीचर्स असू शकतात. म्हणजेच यात यूएसबी चार्जर, मोबाइल कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन आणि ब्लूटूथची सुविधा असू शकते. 

हे पण वाचा – Realme Note 50 हा स्मार्टफोन धडकणार भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून पडतात युजर्स प्रेमात

New Hero Passion किंमत

सध्या तरी कंपनीने या बाईक बाबत कुठल्याही प्रकारची माहिती सादर केली नाही परंतु मिळालेल्या काही मीडिया रिपोर्टनुसार ही बाई भारतामध्ये 95 हजार रुपये इतक्या किमतीवर लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आणि कलर ऑप्शन पाहायला मिळतील. या बाईकच्या आगमनानंतर Honda Shine चे मात्र मोठे नुकसान होणार आहे. कारण हे होंडा शाईन सुद्धा याच किमतीमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे.

Samsung s22 ultra या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 30,000 रुपयांची सूट