POCO C65 स्मार्टफोन झाला लॉन्च, Flipkart वर मिळत आहे धमाकेदार Offer

POCO C65

स्मार्टफोन प्रेमीं साठी अतिशय आनंदी बातमी समोर आली आहे,POCO ने त्यांचा नवीन स्मार्ट नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने नुकताच लॉन्च केलेल्या रेडमी 13c चे रिब्रँडेड व्हर्जन आहे. या मिड रेंज स्मार्टफोन मध्ये अतिशय शानदार फीचर्स दिलेला आहे. या मध्ये फोटोग्राफीसाठी AI कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G85 पॉवरफुल प्रोसेसर देण्यात आलेला आहे.कंपनीने या डिव्हाइस साठी दोन अँड्रॉईड अपडेट आणि तीन वर्ष्याची सेक्युरिटी अपडेट दिली आहे.

जर तुम्ही सुद्धा मिड रेन्जस्मार्ट फोन खरेदी करण्याच्या विचारात असताल.तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधी असू शकते .तर चला जाणून घेऊया या मिड रेन्ज स्मार्टफोन च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

POCO C65 OFFER

POCO C65 स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आपल्याला भेटणार अतिशय सुंदर अशी ऑफर .आपल्याला हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू या दोन रंगांमध्ये भेटून जाईल .फ्लिपकार्टवरून ही आपल्या ला खरेदी करता येणार आहे .तसेच ICICI BANK क्रेडिट आणि डेबिट कार्ड वर 1000 रुपयाची सवलत मिळणार आहे.त्यासोबत आपल्याला EMI पर्याय देखील उपलबध असणार आहे .

POCO C65 FEATURE

POCO C65 स्मार्टफोन मध्ये 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जातो, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 1600×720 पिक्सेल रिझोल्युशन सपोर्ट सह येतो. हा डिस्प्ले 600 निट्स ब्राईटनेस ला सपोर्ट करतो सोबतच यामध्ये वॉटर नोच टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 8gb रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Octa-core सीपीयू असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Mediatek MT6769Z Helio G85 चीप सेट वापरण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचे वजन 192 ग्राम इतकी असून याचे डायमेन्शन 168 x 78 x 8.1 mm इतके आहे.

हे पण वाचा – Vivo S18 सिरीज झाली बाजारपेठेत लॉन्च, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही सिरीज अखेर उतरली बाजारात

POCO c65 CAMERA आणि BATTERY :

या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफी करण्यासाठी फोन च्या मागील बाजूस आर्टीफिसिअल इंटेलिजन्स प्रायटेक्नॉलॉजी असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल चा आनंद घेण्यासाठी 8 मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा दिला गेलेला आहे.या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोबाइलला चार्जिंग साठी 18W चा USB टाइप-सी पोर्ट मिळतो.

Lava Yuva 3 Pro Launch : सर्वात स्वस्त आणि जबरदस्त स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत आणि फीचर्स पहा