Vivo S18 सिरीज झाली बाजारपेठेत लॉन्च, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही सिरीज अखेर उतरली बाजारात

vivo s18

चायनीज स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo ने भारतीय बाजारपेठेत त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज केली आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीज चा टीजर लॉन्च केला होता, या सिरीजमध्ये Vivo S18, S18 Pro आणि S18e हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स शानदार आहेत, फोनची डिझाईन आणि लुक खूपच आकर्षक आणि स्टायलिश आहे. तसेच या स्मार्टफोनचा कॅमेरा खूपच उत्कृष्ट दर्जाचा आहे.

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीने हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला असून, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चला तर मग पाहूया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Vivo S18 सिरीज फीचर्स

Vivo S18, S18 Pro या स्मार्टफोनच्या सिरीज मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा कर्व्ड OLED डिस्प्ले दिला गेलेला आहे, हा डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट सपोर्ट 2400× 1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. हा डिस्प्ले 2800 Nits पीक ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. S18e मध्ये 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. Android 14 वर आधारित S18 या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट देण्यात आलेला आहे, तर S18 Pro आणि S18e मध्ये अनुक्रमे MediaTek Dimension 9200+ आणि Dimension 7200चिपसेटचा समावेश आहे.

या तिन्हीही स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 256GB/8GB रॅम, 256GB/12GB रॅम आणि 512GB 12GB रॅम असे स्टोरेज देण्यात आलेले आहे.

Vivo S18 सिरीज कॅमेरा आणि बॅटरी

S18 या स्मार्टफोनमध्ये 50 MP चा रियर कॅमेरा दिला गेलेला आहे, आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. S18 Pro यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50MP+ 50MP आणि 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. S18e यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला गेलेला आहे.

या डिवाइस ला पावर देण्यासाठी S18 आणि Pro यामध्ये 5000mAH बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट येते. S18e यामध्ये 4800mAH बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे.

हे पण वाचा – Infinix चा स्वस्त स्मार्टफोन झाला लॉन्च, 5000 mAH बॅटरी आणि बरेच काही तगडे फीचर्स, एकदा पहाच

Vivo S18 सिरीज किंमत

Vivo S18 या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज बेस्ट मॉडेल ची किंमत सुमारे 27100 रुपये एवढी आहे. Vivo S18 Pro या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंट 12 जीबी रॅम आणि256 जीबी मॉडेल ची किंमत 37,700 रुपये ठेवण्यात आली आहे. Vivo S18e 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरीएंट ची किंमत 24700 रुपये एवढी ठेवली गेली आहे.

POCO C65 स्मार्टफोन झाला लॉन्च, Flipkart वर मिळत आहे धमाकेदार Offer