Samsung या स्मार्टफोन कंपनीच्या अनेक स्मार्टफोन च्या किमतीमध्ये झाली कपात

Samsung

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन कंपन्या मागील काळापासून कार्यरत आहेत.Samsung या स्मार्टफोन कंपनीने वेगवेगळे फीचर्स असलेले स्मार्टफोन स्मार्टफोन प्रेमींसाठी आणले आहेत. मागील काही काळापासून Samsung या स्मार्टफोन कंपनीने आपल्या काही स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. कंपनी Galaxy M आणि F या सिरीज मधील स्मार्टफोन स्वस्त केले आहेत. या स्वस्त स्मार्टफोनच्या यादीमध्ये Samsung Galaxy M14, Samsung Galaxy M04, Samsung Galaxy F14 आणि Samsung Galaxy F04 या स्मार्टफोनचा समावेश आहे.

या स्मार्टफोनच्या नवीन नवीन किमती ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपनीच्या साइटवर लाईव्ह देखील झाले आहेत. मागील काही काळात लॉन्च झालेल्या Samsung Galaxy S23, S23+ या स्मार्टफोनच्या किमतीमधील देखील घट झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्व स्मार्टफोनच्या नव्या किमती.

Samsung Galaxy M14

Samsung या स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy M14 या स्मार्टफोनचे दोन व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये 4GB रॅम + 128GB यावेळी ची किंमत हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा 13,490 रुपये होती, परंतु आता या स्मार्टफोनची किंमत 12,490 रुपयांवर आली आहे. तसेच दुसरा 6GB RAM + 128GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरियंट ची किंमत 13,990 रुपये झाली आहे.

Samsung Galaxy S23

Samsung या स्मार्टफोन कंपनीचा S24 सिरीज लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने S23 ही सिरीज लॉन्च केली होती. यामध्ये देखील दोन वरिअंट उपलब्ध आहेत,Samsung Galaxy S23 128GB इंटरनॅशनल असलेल्या व्हेरियंटची किंमत लोन झाला होता तेव्हा 74,999 रुपये एवढी होती, या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये देखील कपात झाल्यानंतर 64,999 रुपये एवढी झाली आहे.

तर 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत लॉन्च केला तेव्हा 79,999 रुपये एवढी होती, मात्र कपात झाल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत 69,999 रुपये एवढी झाली आहे.

Samsung Galaxy A05s

Samsung Galaxy A05s या फोनमध्ये देखील आपल्याला दोन वेळेस पाहायला मिळतील.4GB आणि 6GB रॅम असे आहे, 4GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 1000 रुपयांनी कमी झाली आहे तर 6GB रॅम असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या किमती कमी झाल्यानंतर 4GB व्हेरियड ची किंमत 11,499 रुपये एवढी झाली आहे. तसेच 6GB रॅम असलेल्या वेरीएंट ची किंमत 12,999 रुपये एवढी झाली आहे.

हा स्मार्टफोन आपल्याला लाइट ग्रीन, लाइट व्हायलेट आणि ब्लॅक कलर या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो.

Samsung Galaxy F14

या स्मार्टफोन मध्ये देखील आपल्याला दोन व्हेरिएंट पाहायला मिळतील. 4GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या ची किंमत 13,499 रुपये एवढी होती तर आत्ता हा स्मार्टफोन आपल्याला 11,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच त्याचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंट त्याची किंमत 15,990 रुपये एवढी होती, तर आता हा स्मार्टफोन 13,490 रुपयांमध्ये मिळत आहे.

हे पण वाचा – Nokia ने केला Nokia Maze Pro हा स्मार्टफोन लॉन्च, बॅटरी बॅकअप पाहून व्हाल दंग

Samsung Galaxy M04 आणि F04

Samsung Galaxy M04 या स्मार्टफोनच्या सिंगल 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये होती, जी की आता 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे Samsung Galaxy F04 या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये एवढी होती जी की आता 1,700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

जर तुम्ही सुद्धा सॅमसंगचा एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. वरील माहिती दिल्याप्रमाणे सर्व स्मार्टफोनच्या किमतीत कपास झाली आहे. ई-कॉमर्स फ्लिपकार्ट आणि अमेझॉन त्यावर देखील कमी किमतीत लाईव्ह करत आहे. हे स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.

Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी पाहून युजर झाले दंग