Alto K10 : भारतातील सर्वात स्वस्त कार, याच्या बेस मॉडेल ची किंमत आहे फक्त 4 लाख रुपये

alto k10

देशभरातील सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहे तर दुसरीकडे, अशी एक कार कंपनी आहे जी फक्त चार लाखांमध्ये त्यांची कार ऑफर करते. मारुती सुझुकीच्या या कारचे नाव आहे Alto K10. जर आपण देशातील सर्वात की फायदे किंवा कार बद्दल बोललो तर आज सुद्धा Alto K10 या कारचे नाव सर्वात वर येते.

मारुती अल्टो ही अशी कार आहे जिने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत या कारचे 43 लाखांपेक्षा जास्त युनिट विकले गेले आहेत. यावरून तुम्ही याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावू शकता. वर्ष 2024 मध्ये सर्वात स्वस्त कार म्हणून चार लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये ही कार खरेदी करता येणार आहेत. चला तर मग पाहूया या कारचे फीचर्स आणि सर्व स्पेसिफिकेशन.

Alto K10 इंजिन

Alto K10 ही कार 1.0-लीटर पेट्रोल इंजिनसह येते, जे 67 PS आणि 89 Nm जनरेट करते. इंजिन न्यूट्रल-इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी सह येते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स आहे. या इंजिनसह CNG किट देखील दिले जाते, CNG वर त्याचे पॉवर आउटपुट 57PS आणि 82.1Nm आहे. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

Alto K10 मायलेज 

मारुती सुझुकीची ही कार तुम्हाला पेट्रोल (मॅन्युअल), पेट्रोल (ऑटो गियर शिफ्ट) आणि सीएनजी (मॅन्युअल) या तीन ऑप्शन मध्ये पाहायला मिळते. पेट्रोल इंधनासह येणारा मॅन्युअल प्रकार एका लिटर पेट्रोलमध्ये 24.39 किलोमीटरपर्यंत चालेल. ऑटो गियर शिफ्टसह येणारा पेट्रोल प्रकार एका लिटरमध्ये 24.90 किलोमीटरपर्यंत चालेल. सीएनजी पर्यायामध्ये येणारा मॅन्युअल प्रकार एक किलो सीएनजीमध्ये 33.85 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल.

Alto K10 डिझाईन 

Alto K10 याच्या एक्स्टर्नल डिझाईन मध्ये पुढील आणि मागील बंपरचे नवीन स्टाइल, रिसेस केलेले हॅलोजन हेडलॅम्प, नवीन वन-पीस ग्रिल, सिल्व्हर व्हील कव्हर्ससह काळ्या स्टीलची चाके, क्वाड टेललाइट्स, इंटिग्रेटेड स्पॉयलर, हाय-माउंट स्टॉप लॅम्प आणि टर्न इंडिकेटर दिले आहेत.

Alto K10 सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड या सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Alto K10 फीचर्स 

Alto K10 या कारच्या फीचर्स लिस्ट मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, डिजीटाइज्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर ऍडजेस्टेबल ORVM दिले गेले आहेत. त्यासोबतच सेफ्टीसाठी यामध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर प्रदान करण्यात आले आहेत.

Alto K10 किंमत

मारुती सुझुकीच्या या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 3 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते. सीएनजी व्हेरियंटची किंमत अंदाजे 1 लाख रुपये जास्त आहे. त्याचे CNG मॉडेल VXI वर आधारित आहे आणि पेट्रोल VXI प्रकाराची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 5 लाख 96 हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Hero Hunk या मॉडल ने मारली बाजारात एन्ट्री, याची फीचर्स आणि डिझाईन पाहून व्हाल थक्क