Hero Electric Splendor : 250 किमी रेंज, 100KMPH टॉप स्पीड असे बरेच फीचर्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाइक

Hero Electric Splendor

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करीत आहेत, यामध्ये देशातील सर्व प्रसिद्ध टू व्हीलर बाईक Hero Splendor सुद्धा आता इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारामध्ये येणारअसल्याची माहिती मिळाली आहे. हिरो मोटर इंडिया लवकर त्यांची Hero Electric Splendor लॉन्च करणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजपर्यंत मायलेज यांनी कॉलिटी साठी ओळखली जाणारी Hero Splendor आता इलेक्ट्रिक स्वरूपात येणार असल्यामुळे, बरेच जण याची आतुरता पाहत आहेत. आजच्या या लेखांमध्ये Hero Electric Splendor बाईक विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. लोकांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीने देशातील सर्वाधिक विक्री होणारी ही बाइक इलेक्ट्रिक स्वरूपात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग पाहूया या बाईक बाबत अधिक माहिती. 

Hero Electric Splendor 

Hero Electric Splendor बाईक अजून लॉन्च झालेली नाही पण लीक्स नुसार,  आम्हाला कळले आहे की हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाईक ही अतिशय उत्तम इलेक्ट्रिक बाईक असणार आहे आणि या प्रकारच्या आधुनिक फीचर्स सह ही पहिली बाईक असेल, Hero Electric Splendor बाईक लॉन्च होण्याची अनेक लोक वाट पाहत आहेत कारण जुनी स्प्लेंडर फार पूर्वी खूप प्रसिद्ध होती, त्यामुळे नवीन इलेक्ट्रिक स्प्लेंडर कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Hero Splendor Electric रेंज आणि टॉप स्पीड

  • कंपनी Hero Electric Splendor बाईकला 4.0Kwh लिथियम-आयन बॅटरीसह 3000W BLDC मोटर प्रदान करण्याची योजना आखत आहे.
  • एका चार्जवर त्याची रेंज 250 किलोमीटर असेल आणि ती केवळ 7 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते.
  • आगामी स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक एका पूर्ण चार्जमध्ये 250 किलोमीटरपर्यंत सहज चालवता येते.
  • त्याचा टॉप स्पीड सुमारे 100 किलोमीटर प्रति तास असणार आहे, जो बाजारात सध्याच्या बाइक्सपेक्षा 15 किलोमीटर प्रति तास जास्त असेल.

 फीचर्स 

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये, कंपनी चांगल्या ब्रेकिंग सिस्टमसाठी पुढील आणि मागील टायरवर सिंगल डिस्क ब्रेक देऊ शकते. बाईकचे वजन 115 किलो असेल. डिस्प्लेमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह बॅटरीची स्थिती आणि इतर विविध वैशिष्ट्ये असतील.

ताज्या अपडेट्स नुसार नवीन स्प्लेंडरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिस्प्ले आणि नेव्हिगेशन सिस्टम, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि कमी बॅटरी असेल. 

Hero Electric Splendor किंमत

Hero Splendor अजून लॉन्च झालेला नाही पण या इलेक्ट्रिक बाईकची अपेक्षित किंमत रु. 90 हजार ते 1 लाख असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

JAWA Yezdi Roadster : या बाईक खरेदीवर मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काउंट, संधीचा लाभ घ्या