JAWA Yezdi Roadster : या बाईक खरेदीवर मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काउंट, संधीचा लाभ घ्या

JAWA Yezdi Roadster

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशभरातील सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या बाईक्स वर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहेत. याच यादीमध्ये Jawa-Yezdi बाईकचा ही समावेश झाला आहे. या कंपनीने आता ग्राहकांसाठी कीप रायडिंग मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकाला असायला मिळणार आहे की जर एखाद्याने नवीन बाई खरेदी केली तर त्याला एक महिन्याचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. मात्र यामध्ये बाईक खरेदी करणाऱ्याला किती पेट्रोल दिले जाईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ही ऑफर Yezdi roadster आणि Jawa 42 या दोन बाइक वर उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीच्या बाईक खरेदीवर 30,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ सुद्धा दिला जात आहे. यामध्ये तुम्ही डिस्काउंट ऑफर एक्सचेंज ऑफर इत्यादी गोष्टींचा फायदा घेऊन अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतात. चला तर मग पाहूया Jawa-Yezdi च्या या विशिष्ट ऑफर बद्दल अधिक माहिती…

ॲक्सेसरीजवर 50 टक्के सूट

नवीन बाईक खरेदी करताना तुम्ही तुमची जुनी बाईक जमा करत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 10,000 रुपयांची ऑफर मिळत आहे. याशिवाय बाईकची विस्तारित वॉरंटी चार वर्षांसाठी किंवा 50 हजार किमीच्या राइडसाठी, यापैकी जे आधी असेल ती दिली जात आहे. या सर्वांशिवाय काही विशिष्ट ॲक्सेसरीजवर 50 टक्क्यांपर्यंत सूटही उपलब्ध आहे.

जावा भारतात Jawa 42, 42 Bobber, Perak आणि Roadster ऑफर करते. तुम्हाला सांगू इच्छितो की भारतात येझदी रोडस्टरची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये आहे. याशिवाय Jawa 42 ची मूळ किंमत 1.98 लाख रुपये आहे.

हे पण वाचा – Vivo V26 Pro 5G दमदार कॅमेरा कॉलिटी सह, हा स्मार्टफोन उडवून टाकणार भारतीय बाजारपेठेत धुरळा

Yezdi Roadster फीचर्स 

Yezdi Roadster मॉडेलच्या इंजिनबद्दल बोलायचे तर कंपनीने याला 334 cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे सुमारे 29.5 PS पॉवर आणि 28.9 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्युअल चॅनल एबीएसचे फीचर्स देण्यात आले आहेत.

नवीन येझदी रोडस्टरच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कंपनीने नवीन प्रीमियम डायमंड कट अलॉय व्हील, वाहनाच्या एक्झॉस्टवर रेवेन टेक्सचर फिनिश, याशिवाय हँडलबार माउंटेड मिरर, नवीन हँडलबार ग्रिप, 1440 mm लांब व्हीलबेस देण्यात आला आहे. याशिवाय हे मॉडेल फॉरेस्ट ग्रीन, लुनर व्हाइट, रश अवर रेड आणि शॅडो ग्रे अशा चार रंगांच्या पर्यायांसह सादर करण्यात आले आहे.

Kawasaki Ninja बाईकवर मिळत आहे तगडे डिस्काउंट, साधारण किमतीमध्ये पावरफुल  स्पोर्ट बाईक

Hero Electric Splendor : 250 किमी रेंज, 100KMPH टॉप स्पीड असे बरेच फीचर्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाइक