Kawasaki Ninja बाईकवर मिळत आहे तगडे डिस्काउंट, साधारण किमतीमध्ये पावरफुल  स्पोर्ट बाईक

Kawasaki Ninja

Kawasaki Ninja 400 ही बाई तिच्या स्पीड आणि लुक साठी सर्वत्र प्रसिद्ध आहे, कावासाकीची ही बाई तिच्या पावरफुल इंजिनमुळे युवकांच्या हृदयावर राज्य करते. मात्र आता Kawasaki Ninja च्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने त्यांच्या या बाईकवर भरगोस डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. यामुळे जर तुम्ही सुद्धा ही बाई खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते. जानेवारी महिन्याच्या 31 तारखेपर्यंत कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे .

कंपनीने त्यांच्या Ninja 400, Vulcan S, Ninja 650 and Versys 650 या चार बाईकवर डिस्काउंट ऑफर लागू केली आहे, 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही शोरूम प्राईज वर वाउचर रीडिम करू शकता. चला तर मग पाहूया कंपनीने त्यांच्या बाईकवर जाहीर केलेल्या ऑफर बाबत सविस्तर माहिती…

Kawasaki Ninja डिस्काउंट ऑफर 

कंपनीच्या या ऑफर मध्ये तुम्ही Kawasaki Ninja 400 या  बाईक ची किंमत 5.24 लाख रुपये इतकी आहे ज्यावर तुम्ही 40,000 रुपये बचत करू शकता. Vulcan S या बाईची किंमत 7.10 लाख रुपये इतकी आहे ज्यावर तुम्ही 60000 रुपये आणि Ninja 650 या 7.16 लाख किमतीच्या बाईकवर 30,000 रुपये पर्यंत सूट मिळू शकतात. त्यासोबतच Versys 650 या 7.77 लाख रुपयांच्या बाईकवर तुम्ही 20,000 रुपये थेट डिस्काउंट मिळवू शकता.

जर तुम्ही सुद्धा Kawasaki च्या यापैकी कोणतीही बाई खरेदी करण्यास इच्छुक असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या डीलरशिप सोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊ शकता.

Kawasaki Ninja

Kawasaki Ninja फीचर्स 

Kawasaki बाईक मध्ये कंपनीने 399cc पॅरलल ट्विन आणि लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे जे 10,000 rpm वर 49 PS चा पॉवर आणि 8,000 rpm वर 38 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. याशिवाय, यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे आणि त्यात 13.4 लीटरची इंधन टाकी आहे.

Vulcan S फीचर्स 

Vulcan S बाईकमध्ये 649 cc पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7,500rpm वर 61 bhp पॉवर आणि 6,600rpm वर 62.4Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकचे वजन 235 किलो आहे. मोटारसायकलच्या सीटची उंची 705 मिमी आहे आणि त्यात 14 लीटरची इंधन टाकी आहे.

Ninja 650 फीचर्स

Ninja 650 मध्ये 649cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे आता E20 वर अपग्रेड केले गेले आहे. हे इंजिन 8,000rpm वर 67.3bhp ची पॉवर आणि 6,700rpm वर 64 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Ninja 650 हे ट्रेलीस फ्रेमवर डिझाइन केलेले आहे, 41 मिमी टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंगसाठी, ड्युअल चॅनल ABS, 17-इंच अलॉय व्हील, 120/70-सेक्शन फ्रंट आणि 160/60-सेक्शन मागील ट्यूबलेस टायरसह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक कंट्रोल प्रदान केले आहे.

हे पण वाचा – JAWA Yezdi Roadster : या बाईक खरेदीवर मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काउंट, संधीचा लाभ घ्या

Kawasaki Versys 650 फीचर्स

Kawasaki Versys 650 मध्ये 649 cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन सिलेंडर इंजिन आहे जे 66Hp जनरेट करते, त्याची शक्ती 8500 RPM आहे, यात 6 मॅन्युअल गियर बॉक्स आहे. Versys 650 मध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देखील उपलब्ध असतील. यात समोर 300 MM डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 MM डिस्क ब्रेक असतील. यात 21 लीटरची इंधन क्षमता असलेली टाकी आहे, बाईकचे एकूण वजन सुमारे 219 KG आहे.

Samsung Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन धडकणार बाजारात, कॅमेरा कॉलिटी पाहून पळाले तोंडचे पाणी