POCO X6 Pro 5G हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल या स्मार्टफोनचे दिवाने

POCO X6 Pro 5G

POCO या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन युजर्सच्या मनावर खूपच राज्य केले आहे. ही स्मार्टफोन कंपनी आपल्या X6 सिरीज वर खूप दिवसापासून काम करत होती. या स्मार्टफोन कंपनीने POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G हे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन कंपनीने, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेला हा एक व्हेरियंट लॉन्च केला आहे.

जर तुम्ही सुद्धा एका नवीन स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

POCO X6 Pro 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनचे वजन 190 g एवढे आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन 1220 x 2712 एवढ्या पिक्चर रिजर्वेशन सही येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 8300 Ultra हा चिप्स दिला गेला आहे, ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरियंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

POCO X6 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा अतिशय सुंदर आनंद घेत येईल. एवढेच नव्हे तर यामध्ये समावेश आहे. तसेच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, त्यासोबतच 67W चा फास्ट चार्जर ही देण्यात आला आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या पण 45 मिनिटात 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी पाहून युजर झाले दंग

POCO X6 Pro 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायची झाले तर, या स्मार्टफोन मधील 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 24,999 रुपये एवढी आहे. तर 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये एवढी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन आपल्याला Black, Yellow, Gray या तीन कलर ऑप्शन मध्ये पहायला मिळू शकतात.

हे तिन्ही कलर ऑप्शन खूपच मनमोहक आहेत. जर तुम्ही सुद्धा एखाद्या नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Nothing phone 2 या स्मार्टफोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, फीचर ही दमदार