Poco M6 5G Launching : 22 डिसेंबरला हा बजेट स्मार्टफोन धडकणार, पहा फीचर्स आणि डिझाईन

Poco M6 5G

Poco या चायनीज कंपनीने भारतीय बाजारपेठेत खूपच वर्चस्व प्रस्थापित केले आहे, कंपनीने X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Poco M6 5G या स्मार्टफोनचा टीजर लॉन्च करून, लॉन्चिंग डेट ची माहिती सादर केली आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, हा स्मार्टफोन MediaTek Dimension 6100+ या प्रोसेसर सहील येईल. हा स्मार्टफोन आपल्याला 22 डिसेंबरला बाजारात खरेदी करण्यासाठी मिळेल. याशिवाय कंपनीने अद्याप फोन विषय इतर स्पेसिफिकेशन बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.

हा स्मार्टफोन Xiaomi चा पूर्वीचा स्मार्टफोन Redmi 13c चा री ब्रांडेड व्हर्जन असू शकतो, मिळालेल्या माहितीनुसार कंपनी त्यांचा हा नवा स्मार्टफोन रिब्रांडेड स्वरूपामध्ये लॉन्च करण्याच्या तयारी मध्ये आहे. हा स्मार्टफोन 22 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने आधुनिक फीचर्स वापरले आहेत, चला तर मग पाहूया स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

Poco M6 5G डिझाईन

या स्मार्टफोनच्या डिझाईन विषयी बोलायचे झाले तर यामध्ये प्रीमियम स्काय डांस डिझाईन दिले गेले आहे. या स्मार्टफोनच्या स्क्रीन मध्ये वॉटर ड्रॉप नॉट डिझाईन पाहायला मिळते. याच्या उजवीकडे पावर बटन आणि वोल्युम बटन दिले गेले आहे. या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे.

Poco M6 5G फीचर्स

Poco M6 5G या स्मार्टफोनमध्ये 6.75 इंचाचा डिस्प्ले दिला गेलेला आहे, हा डिस्प्ले 90HZ रिफ्रेश रेट्स आणि 720 x 1600 पिक्सेल रिझोल्युशन सह दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 600 NITS ब्राईटनेस ला सपोर्ट करणारा दिला जाऊ शकतो.Android 13 वर आधारित असणाऱ्या या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6100+ चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे यामध्ये तुम्हाला तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो.तुमच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर ही दिले गेले आहे.

Poco M6 5G कॅमेरा आणि बॅटरी

Poco M6 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा wide कॅमेरा देण्यात आलेला आहे, तसेच व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सेल्फी साठी 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आलेला आहे. यासोबतच एलईडी फ्लॅश चा ही समावेश आहे. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायरर्ड Type-c चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा – धडाकेदार Realme C55 5G स्मार्टफोन मिळतोय 10,000 पेक्षाही स्वस्तात, एकदा पहाच

Poco M6 5G लॉन्चिंग आणि किंमत

या स्मार्टफोन मध्ये स्टार लाईट ब्लॅक, स्टार्ट रेल ग्रीन आणि स्टार्ट ट्रेन सिल्वर या ऑप्शन मध्ये तुम्हाला कलर पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X नुसार हा स्मार्टफोन 22 डिसेंबरला लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन 12499, तसेच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन 14999 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Nothing Phone 2a डिझाईन झाली लिक, व्हायरल होत आहे कॅमेरा आणि डिझाईन विषयी माहिती