Hero Mavrick 440 Launching : 23 जानेवारीला लॉन्च होणार ही पॉवरफुल बाईक, Royal Enfield ला देणार टक्कर

Hero Mavrick 440

Hero MotoCorp हे वर्ष 2024 अतिशय भव्य पद्धतीने सुरू करण्याची तयारी करत आहे, ती 23 जानेवारी रोजी आपल्या नवीन मोटरसायकलचे अनावरण करणार आहे. Hero MotoCorp आपली नवीन फ्लॅगशिप बाइक Hero Mavrick 440 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे या वर्षी कंपनीचे पहिले लाँच असेल, लाँच करण्यापूर्वी चाचणी दरम्यान स्पॉट केले गेले आहे.

ही मोटरसायकल Harley Davidson X440 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, पण त्याची रचना आणखीन अपडेट असणार आहे. त्याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही बाईक 2 लाख रुपये किमतीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे,जर या किमतीत ती ऑफर केली गेली तर ती Harley-Davidson X440 पेक्षा अधिक परवडणारी बाईक बनेल.

Hero Mavrick 440 इंजिन

Hero Mavrick 440 बाइकला 440cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार आहे. जे ऑइल /एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे. हे इंजिन 6,000rpm वर 27bhp ची कमाल पॉवर आणि 4,000rpm वर 38Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिसू शकतो.

Hero Mavrick 440 डिझाईन

Hero Mavrick 440 या बाईच्या लूक आणि डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर टेस्ट म्युल बघून हे दिसून येते की Hero Maverick 440 मध्ये सर्क्युलर हेडलॅम्प, वाईड हँडलबार, मोठी फुल टॅंक, अलॉय व्हील्स आणि सिंगल पॉड TFT कन्सोल असेल. यामध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिसू शकतो, ज्यामध्ये ट्रिपर नेव्हिगेशनसह बरीच माहिती दिसू शकते.

Hero Mavrick 440 फीचर्स

Hero Mavrick 440 या बाईच्या फीचर्स लिस्ट मध्ये TFT इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, Apple-Android  ॲप्स कनेक्टिव्हिटी. त्यासोबतच नवीन Hero Karizma सारखे स्मार्टफोन इंटिग्रेशन फीचर्स दिले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की Hero MotoCorp दोन सेगमेंटमध्ये मोटरसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

यामध्ये कोर प्रीमियम आणि अप्पर प्रीमियम श्रेणीतील बाइक्सचा समावेश असेल. Mavrick 440 वरच्या प्रीमियम श्रेणीत आणले जाईल. कंपनीने देशभरातील 100 खास स्टोअर्सद्वारे प्रीमियम बाइक्स विकण्याची योजना आखली आहे.

हे पण वाचा – Nothing phone 2 या स्मार्टफोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, फीचर ही दमदार

Hero Mavrick 440 किंमत

Mavrick 440 ची किंमत जवळपास 2 लाख रुपये असू शकते. ही बाईक Harley-Davidson X440 पेक्षा स्वस्त असेल, ज्याची किंमत 2.36 लाख ते 2.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही किंमत मात्र निव्वळ नुसार घेण्यात आली आहे परंतु कंपनीने याच्या किमती बाबत अद्यापही कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाही.

प्रतिस्पर्धी 

Hero Mavrick 440 ही बाईक Royal Enfield Classic 350 आणि Honda CB350 शी स्पर्धा करू शकते.

फक्त 40,000 रुपयांमध्ये घरी घेऊन जा पावरफुल इंजिन असणारी KTM RC 200 ही बाईक, डिटेल मध्ये माहिती पहा