Royal Enfield Shotgun 650 : ही पावरफुल बाईकउतरली बाजारात, 650cc इंजिन आणि किलर लुक

Royal Enfield Shotgun 650
Royal Enfield Shotgun 650 : ही पावरफुल बाईकउतरली बाजारात, 650cc इंजिन आणि किलर लुक

2023 च्या नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या मोटोवर्स इव्हेंट मध्ये Royal Enfield ने त्यांची ShotGun 650 ही बाईक सादर केली होती. बरेच लोक या बाईकची वाट पाहत असताना कंपनीने आता अखेर ही बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांच्या या बाईची किंमत सांगितली आहे त्यासोबतच ही बाईक बाजारामध्ये विक्रीसाठी नोंद करण्यात आली आहे.

एकूण 4 वेरियंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या या बाईकची किंमत 3.59 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकचे उत्पादन चेन्नई येथील प्लांटमध्ये सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईकच्या फीचर्स आणि पॅसिफिकेशन विषयी अधिक माहिती..

Royal Enfield Shotgun 650 इंजिन

Royal Enfield Shotgun 650 या बाईक मध्ये 648 cc पॅरलल ट्वीन, 4-स्ट्रोक SOHC एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, हे इंजिन 46.3 एचपी पॉवर आणि 52.3 एनएम पिक टॉर्क तयार करते. 6 स्पीड गिअरबॉक्ससह हे इंजिन जोडलेले आहे. ही बाईक प्रति लिटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटर इतके मायलेज देते. या Shotgun 650 बाईकचे वजन 240 किलो आहे आणि इंधन टाकीची क्षमता 13.8 लिटर आहे.

Royal Enfield Shotgun 650
Royal Enfield Shotgun 650 : ही पावरफुल बाईकउतरली बाजारात, 650cc इंजिन आणि किलर लुक

Shotgun 650  डिझाइन

Shotgun 650 या बाईक मध्ये नवीन प्रकारच्या डिझाईनच्या समावेश केला गेला आहे, यामध्ये नवीन फुल टॅंक देण्यात आला आहे. जी Super Metrior पेक्षाही जाड आहे. यासोबतच तुम्हाला यामध्ये नवीन रीअर-सेट फूट पेग्स, पेस्टर-स्टाईल ड्युअल एक्झॉस्ट (सायलेन्सर), स्पेशल टायर्स आणि हँडलर, इंजिन कास्टिंगसाठी चमकदार फिनिश, बार-एंड मिरर आणि रिमूवबल सीट दिली गेली आहे. यामुळे बाईकला फारच किलर लुक मिळतो.

Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात महागडी स्मार्टफोन सिरीज झाली लॉन्च, यामध्ये आहेत पॉवरफुल फीचर्स

Shotgun 650 ब्रेकिंग आणि सस्पेन्शन 

Royal Enfield Shotgun 650 मध्ये ब्रेकिंग साठी समोरच्या चाकाला 320 मिमी डिस्क आणि मागच्या चाकाला 300 मिमी डिस्क ब्रेक आहे. त्यासोबतच सस्पेन्शन साठी मागील बाजूस फ्रंट मेशेवा अप-साइड-डाऊन (यूएसडी) फोर्ट सस्पेंशन आणि प्री-लोडेड एडजस्टेबल ड्युअल शोकऑब्झर्व दिले गेले आहेत.

Shotgun 650 किंमत

बॉबर स्टाइल शॉटगन 650मध्ये 4 वेरियंट650 सीसी सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, रॉयल एनफिल्ड शॉटगन च्या बेस मॉडेल शीट मेटल ग्रे ची एक्स-शोरूम किंमत 3,59,430 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यानंतर, Shotgun 650 चा ग्रीन ड्रिल प्लाझ्मा ब्लू प्रकार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 3,70,138 रुपये आहे. याच्या टॉप व्हेरिएंट Shotgun 650 स्टॅन्सिल व्हाईटची एक्स-शोरूम किंमत 3,73,000 रुपये आहे.

Poco X6 Pro तगडे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी असून मिळत आहे 2000 रुपयांची सूट