Google Pixel 8 स्मार्टफोन खरेदीवर 16000 रुपये सूट, 31 डिसेंबर पर्यंत संधीचा लाभ घेता येणार

google pixel 8

Google या दिग्गज हायटेक कंपनीचा काही दिवसांपूर्वी काल मेड बाय गुगल 2023 हार्डवेअर लॉन्च इव्हेंट पार पडला आहे. तर त्या इव्हेंटमध्ये कंपनीने Pixel 8 हा स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे. कंपनीची हे लेटेस्ट स्मार्टफोन Tensor G3 या चिपसेट वर चालतात. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे, यामुळे याला खूप तगडा परफॉर्मन्स मिळतो. Android 14 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये कंपनीने आधुनिक फीचर्स दिलेले आहेत.

या स्मार्टफोनच्या स्टायलिश डिझाईन मुळे हे डिवाइस खूपच आकर्षक आहे. Pixel 8 या फोन मध्ये AI सपोर्टेड फीचर असल्यामुळे फोटो अनब्लॉक आणि लाईव्ह ट्रान्सलेट इ. ला सपोर्ट करतात. कंपनीने या फोनला 7 वर्षाचा सॉफ्टवेअर सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे.

जर तुम्ही सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कंपनीने काही खास ऑफर लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला नेट 16000 रुपये डिस्काउंट आणि बँक कार्ड ऑफर दिलेले आहेत. चला तर मग पाहूया या ऑफर आणि स्मार्टफोनचे फीचर्स.

Google Pixel 8 ऑफर

Google Pixel 8 या स्मार्टफोन खरेदीवर फ्लिपकार्ट मध्ये ऑफर सुरू आहे. हा स्मार्टफोन घेताना जर तुमच्याकडेही HDFC, Kotak , SBI , AXIS,PNB, RBL, HSBC, IDFC,ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असल्यास तुम्हालाही 16,000 रुपयांची झटकन सूट मिळू शकते. परंतु फ्लिपकार्ट वरून हा स्मार्टफोन खरेदी करताना प्रीपेड पेमेंट करणे गरजेचे आहे, यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन निवडल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. ही ऑफर 31 डिसेंबर पर्यंत मर्यादित राहील.

Google Pixel 8 फीचर्स

तुम्हाला सांगू इच्छितो की हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.2 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्युशन सह दिला गेला आहे, हा डिस्प्ले 2000 नीटस पिक ब्राईटनेस ला सपोर्ट करतो.

Android 14 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Google Tensor G3 पॉवरफुल प्रोसेसर वापरण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त परफॉर्मन्स मिळतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बोलायचे झाले तर यामध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेलेला आहे.

हे पण वाचा – Nothing Phone 2a डिझाईन झाली लिक, व्हायरल होत आहे कॅमेरा आणि डिझाईन विषयी माहिती

Google Pixel 8 कॅमेरा आणि बॅटरी

Google Pixel 8 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा 12 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यामध्ये 10.5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिवाइस ला पावर देण्यासाठी यामध्ये 4575 mAH बॅटरी देण्यात आली आहे, जी 27w वायर चार्जिंग सपोर्ट आणि 18 वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट येते. याची चार्जिंग 30 मिनिटामध्ये 50% पूर्ण होते.

Infinix चा स्वस्त स्मार्टफोन झाला लॉन्च, 5000 mAH बॅटरी आणि बरेच काही तगडे फीचर्स, एकदा पहाच