Motorola या स्मार्टफोन कंपनीच्या हा स्मार्टफोन Moto G Play येऊन धडकणार बाजारात, आत्तापासूनच वाढते आहे युजरच्या मनामध्ये उत्सुकता

Moto G Play
Motorola या स्मार्टफोन कंपनीच्या हा स्मार्टफोन Moto G Play येऊन धडकणार बाजारात, आत्तापासूनच वाढते आहे युजरच्या मनामध्ये उत्सुकता

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्ट कंपन्या स्मार्टफोन प्रेमींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपनी यापैकी एक MOTROLA ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. हे स्मार्टफोन कंपनी लो बजेट सेगमेंट पासून ते फ्लॅग शिप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आली आहे. या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून त्यांच्या युजर सोबत एक अनमोल असे नाते तयार केले आहे.

या स्मार्टफोन कंपनीने Motorola Moto G Play हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याचे ठरवले आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 26 जानेवारी रोजी भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल अधिक माहिती.

Moto G Play फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 500 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा डिस्प्ले 720 x 1600 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM6225 Snapdragon 680 4 हा चीफसेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच सगळा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला हा व्हेरियड पाहायला मिळू शकतो. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो, त्यासोबतच डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass 3 हा ग्लास दिला जाऊ शकतो.

Infinix Note 40 Series : वायरलेस चार्जिंग असणारे हे स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च

Moto G Play कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.

Moto G Play किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीपासूनच या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या युजर समोर लो बजेट सेगमेंट पासून ते हाय बजेट सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Motorola Moto G Play या स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 12,650 रुपये असू शकते. स्मार्टफोन कंपनीने अद्याप किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

80,000 रुपयांचा iphone 15 या स्मार्टफोनची डिस्काउंट किंमत पाहून युजर झाले हैराण, मिळतोय फक्त 61,999 रुपयांमध्ये