Oneplus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येऊन घालणार धुमाकूळ, इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत

Oneplus 12
Oneplus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येऊन घालणार धुमाकूळ, इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य करत आले आहेत. तसेच Oneplus या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हे स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या स्मार्टफोन कंपनीचा Oneplus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लवकरच येण्याची दाट शक्यता आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी सह बाजारात येऊ शकतो.

या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या दमदार कॅमेरा कॉलेटी मुळे बहुतांश स्मार्टफोन प्रेमींचे मन जिंकले आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5400mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनविषयी चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल अधिक माहिती.

Oneplus 12 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.82 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1440 x 3168 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM, 1TB 24GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरीएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर ही देण्यात आला आहे.

Oneplus 12 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 64 मेगापिक्सल+ 48 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5400mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 26 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Samsung Galaxy S21 FE डिस्काउंट सेल मध्ये हा स्मार्टफोन मिळत आहे, फक्त आणि फक्त 16,000 रुपयांमध्ये

Oneplus 12 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत अंदाजे 70,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन 26 जानेवारी पर्यंत भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

पुस्तकासारखा उघडणारा हा स्मार्टफोन Tecno Phantom V2 Fold होणार लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल वेडे