Oppo Reno 11 5G ही सिरीज झाली लॉन्च, प्रोसेसर आणि फीचर्स पाहून व्हाल आश्चर्यचकित

Oppo Reno 11 5G

भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या स्मार्टफोन कंपन्या आहेत, त्यापैकीच एक Oppo ही एक चिनी स्मार्टफोन कंपनी आहे. या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन युजर च्या मनात घर केले आहे.Oppo Reno 11 ही सिरीज लॉन्च करणार आहे.

या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत Oppo Reno 11 5G आणि Oppo Reno 11- Pro 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे ठरवले आहे. हे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 12 जानेवारी रोजी बाजारात विक्रीसाठी येतील. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 8200 या प्रोसेसर चा वापर केल्यामुळे खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

एवढे प्रोसेसर पाहून सर्व स्मार्टफोन प्रेमींच्या मनात या स्मार्टफोनबद्दल आकर्षकता वाढली आहे. या स्मार्टफोन मधील ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप स्मार्टफोन युजरचे लक्ष वेधून घेतो. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Oppo Reno 11 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 950 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. तसेच Android 14 वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Mediatek Dimensity 8200 हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले हे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. याच सिरीज मधील दुसऱ्या वेरी अँड संबंधित बोलायचे झाले तर,

Oppo Reno 11- Pro 5G या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो.Android 14 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Qualcomm SM8475 Snapdragon 8+ हा चिप्स दिला गेला आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM हे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात.

Oppo Reno 11 5G कॅमेरा आणि बॅटरी

या सिरीज मधील दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल असा सेटअप आहे. तगड्या अशा ट्रिपल कॅमेरा सेटअप मुळे फोटोग्राफीचा सुंदर असा परफॉर्मन्स मिळू शकतो, एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या दोन्ही स्मार्टफोन च्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर Oppo Reno 11 5G या व्हेरियंट मध्ये 4800mAH ची बॅटरी आणि 67W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. तर Oppo Reno 11 pro 5G या व्हेरियंटमध्ये 4700mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच त्यासोबत 80W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. कंपनीद्वारे अशी माहिती दिली आहे की हा स्मार्टफोन 27 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – OPPO कंपनीचा OPPO Find X7 Ultra हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून युजर्स पडले प्रेमात

Oppo Reno 11 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर Oppo Reno 11 5G या व्हेरियंट ची किंमत 28,000 रुपये एवढी ठेवली जाऊ शकते. तर Oppo Reno 11 pro 5G यावेळी ची किंमत 35,000 रुपये ठेवली जाऊ शकते. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

या स्मार्टफोन मध्ये Black, Green, Silver हे तीन कलर ऑप्शन पाहायला मिळणार आहेत.

OnePlus 10R 5G : हा स्मार्टफोन 9,000 रुपये ने झाला स्वस्त, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स