OnePlus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, फीचर्स बद्दल माहिती झाली लिक

OnePlus 12

भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्मार्टफोन कंपनी उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक Oneplus ही सुद्धा स्मार्टफोन कंपनी स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य करत आहे. ती स्मार्टफोन कंपनी OnePlus 12 आणि OnePlus 12R हे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही स्मार्टफोन कंपनी OnePlus 12 या सेरीजवर बऱ्याच काळापासून कार्यरत होती. हे दोन्ही स्मार्टफोन आपल्याला भारतीय बाजारपेठेमध्ये 23 जानेवारी रोजी पाहायला मिळणार आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटी तसेच तगड्या प्रोसेसरसह पाहायला मिळू शकतात.

जशी जशी या स्मार्टफोनची लॉन्चिंग तारीख जवळ येत आहे, तसे हे स्मार्टफोन कंपनी या स्मार्टफोनबद्दल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती समोर येत आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि बरेच काही.

OnePlus 12 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, आपल्याला या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा OLED LTPO डिस्प्ले मिळू शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. Andriod 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

Kawasaki Ninja ZX-6R : 11.09 लाख रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली ही पावरफुल बाईक

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर 12GB, 16GB आणि 24GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 256GB आणि 512GB इंटरनल स्टोरेज पाहायला मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

OnePlus 12 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 48 मेगापिक्सल असा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 2X ऑप्टिकल झूम ही फॅसिलिटी देखील पाहायला मिळू शकते. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोन मध्ये दिवाळीला पावर देण्यासाठी 5400mAH ची बॅटरी ड्युअल सेल सेटअप आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट ही दिला जाऊ शकतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म -X द्वारे माहिती मिळाल्याप्रमाणे कंपनीचा असा दावा आहे की, हा स्मार्टफोन अवघ्या 25 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

OnePlus 12 किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार करायची झाले तर 12GB+256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंट ची किंमत अंदाजे 66,240 रुपये असू शकते. तसेच 8GB + 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या वेरियंटची किंमत अंदाजे 56,999 रुपये असू शकते. या स्मार्टफोन कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती विषयी कोणतीही माहिती दिली नाही.

फक्त 25000 मध्ये खरेदी करा TVS Apache स्पोर्ट बाईक, सर्वात कमी किमतीमध्ये घरी घेऊन जा