Redmi 13c 5g च्या या स्मार्टफोन ने मार्केट केले जॅम, दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स

redmi 13c 5g

Redmi या स्मार्टफोन कंपनीने बाजारपेठेत मागील काही काळामध्ये खूपच वर्चस्व निर्माण केला आहे. आम्ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट आणि लो बजेट सेगमेंट मध्ये एक स्मार्ट फोन घेऊन आलो आहोत. Redmi ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जर तुम्ही सुद्धा सेगमेंट मध्ये एखाद्या 5g स्मार्टफोन घेण्याच्या विचारांमध्ये असाल, तुमच्यासाठी हा स्मार्टफोन अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. रेडमी चा हा नवीन स्मार्टफोन नुकताच बाजारात लॉन्च झाला आहे.

या स्मार्टफोनचे नाव Redmi 13C 5G असे आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कमी किमतीत भरपूर फीचर्स मिळत आहेत, आणि त्यासोबतच कॅमेरा क्वालिटी अतिशय सुंदर आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती.

Redmi 13C 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी बोलायचे झाले तर. या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिल्या गेलेला आहे,जो की 90HZ रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 720 x 1600 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. हा डिस्प्ले 600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शन यासाठी यामध्ये गोरिला ग्लास देण्यात आला आहे.

Octa-core प्रोसेसर वर आधारित असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 6100+ प्रोसेसर वापरण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित असून या स्मार्टफोनमध्ये MIUI 14 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे एकूण वजन 192 ग्रॅम एवढे असून याची जाडी 8.1mm इतकी आहे.

Redmi 13C 5G कॅमेरा आणि बॅटरी

आपल्याला या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे, एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच एलईडी फ्लॅश लाईट चा ही समावेश आहे.

Redmi 13C 5G स्मार्टफोनच्या बॅटरी पॉवर आणि फास्ट चार्जिंग सपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जात आहे जो हा फोन कमी वेळेत चार्ज करण्यास सक्षम आहे. या फोनमध्ये तुम्हाला 3.5mm हेडफोन जॅक सह USB Type-C पोर्ट मिळेल.

हे पण वाचा – Galaxy A25 5G आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन होणार लॉन्च, AI सपोर्टेड फोटो एडिटिंग फीचर आणि बरेच काही

Redmi 13C 5G किंमत 

Redmi 13C 5G हा स्मार्टफोन फारच लो बजेट सेगमेंट मध्ये असल्यामुळे त्याच्या 4GB RAM + 128GB व्हेरिएंट ची किंमत 8999 रुपये एवढी आहे, तर 8GB RAM + 256GB या व्हेरिएंट ची किंमत 11499 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन आपल्याला स्टारलाइट ब्लॅक, स्टारट्रेल ग्रीन, स्टारट्रेल सिल्व्हर या तीन कलर मध्ये पाहायला मिळेल. हे तीन रंग ग्राहकांचे मन आकर्षित करत आहेत.

Honor 90 GT : ‘या’ दिवशी होणार हा स्मार्टफोन लॉन्च, स्टोरेज पाहून व्हाल दंग