iQOO Neo 9 Pro या स्मार्टफोनचे ब्लॅक एडिशन पाहून, युजर्स झाले हैराण फीचर्स आहेत दमदार

iQOO Neo 9 Pro या स्मार्टफोनचे ब्लॅक एडिशन पाहून, युजर्स झाले हैराण फीचर्स आहेत दमदार

भारतीय बाजारपेठेत अनेक जुन्या आणि नव्या कंपन्या नवीन नवीन फीचर्स घेऊन भारतीय बाजारात उतरत आहेत. त्यापैकीच एक iQOO ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये घेऊन येण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन Dualtone कलरमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये खूपच तगडे फीचर्स आणि दमदार कॅमेरा क्वालिटी दिली जाऊ शकते.

या स्मार्टफोन मध्ये 5150mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन आपल्याला या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात खरेदी करता येईल, अशी माहिती कंपनीने वर्तवली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि लॉन्चिंग विषयी अधिक माहिती.

iQOO Neo 9 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 144Hz रिफ्रेशेरेट आणि 1400 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकते. हा स्मार्टफोन 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित Octa-core प्रोसेसरसह, या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 9300 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार व्हेरिएट पाहायला मिळू शकतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

iQOO Neo 9 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी Dual कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप दिला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचं झाले तर, देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5160mAH ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 9 मिनिटांमध्ये 40% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Samsung s22 ultra या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 30,000 रुपयांची सूट

iQOO Neo 9 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 40,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन Dual कलर मध्ये असल्यामुळे हा स्मार्टफोन खूपच आकर्षक आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात महागडी स्मार्टफोन सिरीज झाली लॉन्च, यामध्ये आहेत पॉवरफुल फीचर्स