MOTROLA या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत खूपच वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने गेल्या महिन्यात Moto G34 5G हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-X वरून बातमी आली आहे की हा स्मार्टफोन व्हेरियंट भारतात लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच या स्मार्टफोनची लॉन्च ची तारीख देखील लिक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 9 जानेवारीला भारतामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. लो बजेट सेगमेंट मधील हा स्मार्टफोन सर्वात फास्ट 5G स्मार्टफोन असेल.
चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत 11950 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा 5000mah पावरफुल बॅटरी आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात येते. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे ज्यामध्ये स्टार ब्लॅक आणि सी ब्ल्यू कलर उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Moto G34 5G फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, लीक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. हा स्मार्टफोन काही दिवसापूर्वी युरोपियन रिटेलरच्या वेबसाईटवर पाहायला मिळाला होता.
Android 13 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 5G हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये साईट पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे वजन 179g एवढे आहे. हा स्मार्टफोन Octa-core प्रोसेसर सह येतो.
Moto G34 5G कॅमेरा आणि बॅटरी
हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. या स्मार्टफोनच्या कॅमेरासंबंधी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सेल्फी साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबतच एलईडी फ्लॅश चा समावेश आहे.
अशा तगड्या कॅमेरा परफॉर्मन्स मुळे आपल्याला फोटोग्राफीचा सुंदर असा आनंद घ्यायला मिळतो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी दिली गेली आहे, बॅटरी चार्जिंग साठी 18W चा चार्जर ही दिला गेला जातो.
हे पण वाचा – Tecno spark 20 pro : स्मार्टफोन झाला लॉन्च स्टोरेज आणि कॅमेरा कॉलिटी पाहून व्हाल व्हालआश्चर्यचकित
Moto G34 5G किंमत
या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची चिनी बाजारपेठेत किंमत 11950 रुपये एवढी होती. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनच्या अंदाजे किंमत 10,000 रुपये पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
हा स्मार्टफोन आपल्याला ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे.
Poco X6 5G : 11 जानेवारीला लॉन्च होणार हा तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल दंग