Asus ROG Phone 8 ह्या गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग होणार भारतीय बाजारात, फीचर्स पाहून यूजर झाले हैरान

Asus ROG Phone 8

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य करण्याच्या स्पर्धेत आहेत. सध्या सुरू असलेल्या CES 2024 मध्ये ASUS या गेमिंग स्मार्टफोन कंपनी ROG 8 सिरीज लॉन्च केली आहे.ASUS ही कंपनी स्मार्टफोनच नव्हे तर लॅपटॉप सुद्धा निर्माण करते. या स्मार्टफोन कंपनीने ASUS ROG Phone 8 आणि Phone 8 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याचे ठरवले आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला गेमिंग साठी 165HZ रिफ्रेश रेट दिला गेला आहे.

या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे या सिरीज मधील दोन्ही स्मार्टफोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 845 या चिप्स आले आहेत. जर तुम्ही सुद्धा गेमर असाल आणि तुम्हाला गेमिंग स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी दोन्ही स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतात, चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Asus ROG Phone 8 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो की 165Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. हा स्मार्टफोन 2500 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचे वजन 225g एवढे आहे.Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चिप्स दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Asus ROG Phone 8 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल+ 13 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल, एवढेच नव्हे तर फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 5500mAH ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 39 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Samsung Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन धडकणार बाजारात, कॅमेरा कॉलिटी पाहून पळाले तोंडचे पाणी

Asus ROG Phone 8 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत 91,380 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन आपल्याला Phantom Black, Rebel Grey या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे.

हे दोन्ही कलर ऑप्शन खूपच आकर्षक आहेत. जर तुम्ही सुद्धा एक गेमर असाल आणि तुम्हाला एखादा नवीन गेमिंग स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Motorola g34 हा स्मार्टफोन आला बाजारात, फीचर्स पाहून व्हाल या स्मार्टफोनचे दिवाने