Upcoming Cars;बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहेत या ५ धमाकेदार कार; पहा यादी

TOP 5 CARS LAUNCHED IN 20२४:

भारतातील नामांकित ऑटोमोबाइल्स कंपन्या घेऊन येत आहेत त्यांच्या नवीन मॉडेल च्या कार. भारतातील नामांकित कंपन्या मारुती सुझुकी,ह्युंडाई,महिंद्रा,टाटा आणि किया त्यांच्या नवीन CARS लवकरच बाजारात उतरवत आहेत.लाँच होणाऱ्या कारमध्ये ह्युंडाई क्रेटा फेसिलिफ्ट,किया सॉनेट फसलीफ्ट,टाटा कर्व आणि टाटा harrier पेमहिंद्रा क्सयूव्ही ३०० फेसलिफ्ट आणि थार ५ डोर ,नवीन-जनेरल मारुती सुझुकी स्विफ्ट यांसारख्या कारचा समावेश आहे.

१)मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट:

नवीन स्विफ्ट लवकरच भारतात येत आहे.नवीन स्विफ्टची (Maruti Suzuki Swift) लांबी 3860 मिमी आहे, जी पूर्वीपेक्षा थोडी जास्त आहे, तिची रुंदी 1695 मिमी आहे. ग्राउंड क्लीयरन्स 120mm आहे तर व्हीलबेस 2450mm पूर्वीसारखाच आहे. जरी हे त्याच्या जागतिक मॉडेलचे तपशील असले तरी, भारताच्या विशिष्ट मॉडेलचे तपशील, विशेषतः ग्राउंड क्लिअरन्स, वेगळे असू शकतात. हि कार ९ मे २०२४ ला लाँच होण्याची शक्यता आहे.

२)टाटा कर्व:

भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये, Tata Motors ने Curve SUV च्या प्री-प्रॉडक्शन मॉडेलचे अनावरण केले आहे. कंपनीच्या नवीन आणि आगामी मॉडेल्सची रेंज या कार्यक्रमात सादर करण्यात आली, ज्यात टाटा अल्ट्रोझ रेसर, सफारी डार्क एडिशन आणि हॅरियर ईव्ही यांचा समावेश आहे. या कारची किंमत ८लाख ऑनरोड इतकी शक्यता आहे.

३)महिंद्राXUV ३०० फेसलिफ्ट.

नवीन XUV 300 फेसलिफ्टमध्ये 131 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय सध्याच्या 110 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 117 बीएचपी, 1.5 लीटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध असेल. XUV 300 फेसलिफ्टमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात येणार असून या फीचरसह येणारी ही फेसलिस्ट सेगमेंटमधील पहिली कार ठरली आहे. तसेच यात आणखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

४)महिंद्रा थार ५DOOR.

थार च्या चाहत्यांसाठीं गुड न्यूस आहे.महिंद्रा लवकरच घेऊन येत आहे थार ५डोर ते पण भन्नाट फिचर सोबत.सध्या या गाडीची चाचणी अंतिम टप्यात आहे.थार च्या या अपडेट व्हर्सिनमध्ये सामोरे ४ आणि पाठीमागे १डोर मिळेल.इंटिरियर मध्ये १०इंच टचस्क्रीन इंफोटेंटमेंट सिस्टिम ,एक आकर्षक फ्रंट ग्रील,लइ डी प्रोजेक्टरसह लइडी डीरल मिळतील.

५)किया सोनेट फेसलिफ्ट.

किया सोनेट फेसलिफ्ट ही कार येत्या १४ डिसेंबर २०२३ मध्ये बाजारात लॉन्च होणार आहे. या कारमध्येही ग्राहकांना विशिष्ट असे बदल पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये वीनतम सेन्स्युअस स्पोर्टिनेस डिझाइन तत्वज्ञानानुसार आत आणि बाहेरून लक्षणीय बदल करण्यात आल्याची माहिती आहे. कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल, १.० लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिन मिळत आहेत.

6) ह्युंडई क्रेटा फेसलिफ्ट.

ह्युंडई कंपनीची नवी कार ह्युंडई क्रेटा फेसलिफ्ट लवकरच भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार येत्या १६ जानेवारीला भारतात लॉन्च होईल. ग्राहकांना या कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आङे. या कारला बाहेरून तसेच आतून असे दोन्ही बाजूने पुन्हा डिझाइन करण्यात येणार आहे. तसेच कारमध्ये १.५ लीटरचा टर्बो पेट्रोल इंजिन लाईनअप सामील केले जाण्याची शक्यता आहे.