Lava Storm 5G होणार या आठवड्यात लॉन्च, मार्केटमध्ये येण्याच्या आधी जाणून घ्या सर्व फीचर्स

Lava Storm 5G

Lava या कंपनीने भारतीय बाजारपेठेत नुकताच Lava Yuva 3 Pro हा स्मार्टफोन सादर केला होता, या स्मार्टफोन ने खूपच धुमाकूळ घातला होता. या स्मार्टफोन मुळे स्मार्टफोन प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर लागलीच या स्मार्टफोन कंपनी नवीन 5G स्मार्टफोनचा टीजर -X सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे केला आहे, त्यामध्ये कंपनीने हे सांगितलेले आहे की या स्मार्टफोनचे आगामी नाव Lava Storm 5G हे असेल.

कंपनीने सादर केलेल्या टीझर मध्ये एक इमेज शेअर केली गेली आहे, ज्याची कॅप्शन कमिंग सून असे ठेवण्यात आलेले होते. त्यासोबतच अजून एका पोस्टमध्ये तुफान थीम सह आकाशातील लखलखती वीज असणारा एक शॉट व्हिडिओ शेअर केला गेला होता. फोन ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन वर मायक्रो साईट द्वारे पाहायला मिळत आहे. या मायक्रो साईटवर स्मार्टफोन बॅक पॅनलचा फोटो पाहायला मिळाला. या स्मार्टफोनच्या डावीकडे दोन सर्क्युलर कॅमेरा युनिट आणि एक सर्क्युलर LED युनिट पहायला मिळते. त्यासोबतच उजव्या बाजूला वोल्युम आणि पॉवर बटन देण्यात आलेले आहेत.

Lava Storm 5G फीचर्स

या स्मार्टफोनची रचना सॅमसंग फोन सारखी जवळपास सारखीच आहे. या स्मार्टफोनमध्ये एक फ्लॅट फ्रेम आणि कॅमेरा मॉड्युल आहेत. हा स्मार्टफोन बजेट स्मार्टफोन असूनही, यात Redmi 12 आणि Redmi 13C लाईन ऑफ सारखा ग्लास बॅग आहे. या स्मार्टफोनमध्ये 3.5m हेडफोन जॅक व्यतिरिक्त, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि साईड मोड फिंगरप्रिंट सेंसर दिले गेलेले आहेत.या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 6.78 इंचाचा पंचर डिस्प्ले आहे,तसेच याचा पिक्सल रेट 2460 x 1080 एवढा आहे आणि हा स्मार्टफोन 120HZ रिफ्रेश रेट सह येतो.

या स्मार्टफोनची MediaTek Dimensity 6080 चिप्स हे येते.या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बघायचे झाले तर 8 GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह दिला जाऊ शकतो. Android 14 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आधुनिक फीचर दिले जाऊ शकतात.

हे पण वाचा – Honor 90 GT : ‘या’ दिवशी होणार हा स्मार्टफोन लॉन्च, स्टोरेज पाहून व्हाल दंग

Lava Storm 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा आणि 8 मेगापिक्सलचा डोअर रियर कॅमेरा दिला गेलेला आहे, तसेच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला गेलेला आहे. एवढेच नाही तर यामध्ये एलईडी फ्लॅश चा ही समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे,जी की 33W C-Type चार्जिंग सपोर्ट येते.

Lava Storm 5G लॉन्चिंग आणि किंमत

या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग विषयी बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, हा स्मार्टफोन 15,000 रुपये किमतीमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच नुकताच लॉन्च केलेला Lava Blaze 2 5G हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट आणि तीन कलर ऑप्शन मध्ये दाखल केला होता. परंतु Lava Storm 5G स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन विषयी कंपनीने अद्यापही कुठल्या प्रकारची माहिती जाहीर केलेली नाही.

Realme C55 5G Launching- धडाकेदार Realme C55 5G स्मार्टफोन मिळतोय 10,000 पेक्षाही स्वस्तात, एकदा पहाच