Galaxy S24 या सिरीज वर सुरू आहे धमाकेदार डिस्काउंट, कमी किमतीमध्ये लवकर बुक करा

Galaxy S24
Galaxy S24 या सिरीज वर सुरू आहे धमाकेदार डिस्काउंट, कमी किमतीमध्ये लवकर बुक करा

Samsung ने नुकतीच एका ग्लोबल लॉन्चिमेंत मध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Galaxy S24 लॉन्च केली, कंपनीच्या या नवीन सिरीज मध्ये तीन स्मार्टफोन उपलब्ध आहेत ज्यामध्ये Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra असे तीन मॉडेल उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची लॉन्चिंग नंतर कंपनीने त्यांच्या या 5G स्मार्टफोनच्या प्री-बुकिंग वर डिस्काउंट जाहीर केले आहे. यामुळे ग्राहकांना हे स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतात.

कंपनीच्या या स्मार्ट मध्ये AI चांगल्या प्रकारे वापर केला गेला आहे, या स्मार्टफोन मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित फीचर्स देण्यात आले आहेत, जसे की यामध्ये लाईव्ह ट्रान्सलेट, चॅट असिस्टंट, ट्रान्सलेशन असे फीचर्स उपलब्ध आहेत. त्यासोबतच यामध्ये जनरेटिव्ह AI वर आधारित फोटो एडिटिंग ऑप्शन सुद्धा पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर बाबत अधिक माहिती.

भारतात Galaxy S24 ची किंमत 

या स्मार्टफोनच्या बेस मॉडल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे.सोबतच 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरीएंट 89,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन Amber Yellow, Cobalt Violet आणि Onyx Black कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

भारतात Galaxy S24 Plus ची किंमत

12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Galaxy S24 5G चे बेस व्हेरिएंट, जे व्हॅनिला मॉडेलपेक्षा मोठ्या स्क्रीनसह येते, त्याची किंमत 99,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेले टॉप व्हेरिएंट भारतात 109,999 रुपयांनाखरेदी करता येतो. हे Cobalt Violet आणि Onyx Black कलर ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

Galaxy S24 Ultra भारतात किंमत

12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटसाठी ग्राहक सर्वात शक्तिशाली अल्ट्रा मॉडेल रु. 129,999 मध्ये खरेदी करू शकतील. याशिवाय 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 139,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे प्रकार Titanium Grey, Titanium Violet आणि Titanium Black कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यानंतर 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 159,999 रुपयेइतकी आहे, हा स्मार्टफोन Titanium Grey कलर ऑप्शनमध्ये खरेदी केली जाऊ शकते.

हे पण वाचा – Oppo Reno 11 Pro नुकत्याच लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनवर मिळत आहे, दमदार कॅमेरा क्वालिटी आणि दमदार अशी 4,000 रुपयांची सूट

22 हजारांचा फायदा

Galaxy S24 सिरीजच्या प्री-बुकिंग वर कंपनीकडून 15000 रुपयांचा अपडेट बोनस दिला जात आहे, यासोबतच 11 महिन्यासाठी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळतो. या व्यतिरिक्त ग्राहकांना 13000 रुपयांचा अतिरिक्त बोनस हवा असल्यास 5000 रुपये बँक कॅशबॅक आणि 8000 रुपयांचा अपडेट बोनस मिळतो.

जर तुम्ही Galaxy S24 Plus किंवा Galaxy S24 Ultra ची प्री-बुकिंग केली तर तुम्हाला रु. 12,000 चा अपग्रेड बोनस आणि रु. 10,000 चे स्टोरेज अपग्रेड दिले जात आहे. स्टोरेज अपग्रेड म्हणजे तुम्ही 256GB मॉडेल बुक केल्यास, तुम्हाला 512GB स्टोरेज मॉडेल वितरित केले जाईल.

Splendor Plus EMI : फक्त 20,000 हजारांमध्ये ही बाईक घरी घेऊन जा