Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 5,999 रुपयांमध्ये, प्रोसेसर ही दमदार

Samsung Galaxy F04
Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 5,999 रुपयांमध्ये, प्रोसेसर ही दमदार

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. त्यापैकीच Samsung या स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च झाला होता. हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च होऊन सुद्धा ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर प्रजासत्ताक दिनानिमित्त च्या सेलमध्ये या स्मार्टफोनवर खूपच तगडा डिस्काउंट मिळत आहे.

जर तुम्ही सुद्धा 15000 रुपयाच्या रेंजमध्ये एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि या स्मार्टफोनवरील डिस्काउंट.

Samsung Galaxy F04 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसरसह Mediatek MT6765 Helio P35 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

किलर लूक असणारी Bajaj Pulsar ची ही बाईक खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा, फीचर्स आणि किंमत पहा

Samsung Galaxy F04 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी Dual कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे.

Samsung Galaxy F04 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपये एवढी होती. तर सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लागलेल्या ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे. म्हणजे जवळपास या स्मार्टफोन वर आपल्याला 48% डिस्काउंट मिळत आहे.

Realme 12 Pro plus हा स्मार्टफोन धडकन भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी आणि फीचर्स अतिशय दमदार