भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या स्मार्टफोन कंपन्या उपलब्ध आहेत, तसेच भारतात स्मार्टफोन प्रेमी खूपच मोठ्या प्रमाणात फ्लॅगशिप स्मार्टफोनचे दिवाणी आहेत. जर तुम्ही सुद्धा फ्लॅगशिप स्मार्टफोन प्रेमी असाल आणि तुम्हाला सुद्धा आशिष स्मार्टफोन 20 ते 35 हजाराच्या लो बजेट सेगमेंट मध्ये घ्यायचे असतील तर, मी तुमच्यासाठी लो बजेट सेगमेंट मध्ये असलेल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची एक लिस्ट घेऊन आलो आहे. चला तर मग पाहूया लो बजेट सेगमेंट मधील यावर्षीच्या 35 हजाराच्या आत लॉन झालेले बेस्ट स्मार्टफोन.
iQOO Neo 7 Pro
iQOO Neo 7 Pro या स्मार्टफोनच्या बेस् मॉडेल ची किंमत 32,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.78 इंचाचा दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऍक्टिव्हिटी साठी 5g तर सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.या स्मार्टफोन मधील ट्रिपल कॅमेरा सेटअप खूपच मनमोहक आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल +2 मेगापिक्सल सेंसर मिळतो.
तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोनsnapdragon8 plus gen चीप सेट सह येतो, ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळतो.
OnePlus Nord 3 5G
OnePlus या स्मार्टफोन कंपनीतील OnePlus Nord 3 5G हा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 30,377 रुपये पासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.74 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट सपोर्ट सह येतो. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 9000 चीफ सेट वापरला गेला आहे. हा स्मार्टफोन मध्ये 5g कनेक्टिव्हिटी सह, आपल्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
स्मार्टफोन मध्ये 12 GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल कंट्री सेंसर आणि 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आली आहे. त्यासोबतच 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5000mAH पावरफूल बॅटरी दिली आहे.
Motorola Edge 40
Motorola या स्मार्टफोन कंपनी मध्ये Motorola Edge 40 हा एकमेव मॉडेल आहे, जो की 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सह आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 26,499 रुपये एवढी आहे. या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.55 इंचाचा आहे, जो की 144HZ रिफ्रेश रेट सह येतो. हा स्मार्टफोन 4g सपोर्ट कनेक्टिव्हिटी सह येतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल असा सेटअप पहायला मिळतो. सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4400mAH ची बॅटरी देण्यात आली आहे.
हे पण वाचा – Nokia Alpha 2023 : हा आहे नोकिया चा सर्वात स्लिम स्मार्टफोन, यामध्ये मिळत आहे 8900mah बॅटरी
Samsung Galaxy A54 5G
भारतीय बाजारपेठेत Samsung या स्मार्टफोन कंपनीचे फारच वर्चस्व आहे. या स्मार्टफोन कंपनीने फ्लॅगशिप सिरीजचा Samsung Galaxy A54 5G हा एक मिडरेंज स्मार्टफोन लॉन्च केला होता, ज्याची किंमत 34,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा AMLOED डिस्प्ले पाहायला मिळतो, जो की 120HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये Samsung Exynos 1380 हा चीपसेट दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 5g कनेक्टिव्हिटी सह, आयपी 67 रेटिंग हानी फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो, जात 50 मेगा पिक्सल+ 12 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सलचा सेटअप पहायला मिळतो. या स्मार्टफोनच्या टॉप मॉडेल मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज पाहायला मिळतो. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी दिली आहे.
Vivo Y100i power भारतीय बाजारपेठेत लॉन्च, बॅटरी बॅकअप पाहून वाल दंग